संजय यादवराव, समृद्ध कोकण प्रदेश संघटना
गुहागर, ता.19 : विद्यार्थी, युवक आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे समाधी व रायगड किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या समाधी जवळ स्वराज्य भूमी कोकण यात्रेचा अतिशय उत्साहात समारोप झाला. बारा ते पंधरा ऑगस्ट रोजी संपूर्ण कोकणात स्वराज्य भूमी कोकण यात्रेचे आयोजन समृद्ध कोकण प्रदेश संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. Swarajya Bhoomi Konkan Yatra successful

कोकणातील महान व्यक्तिमत्व राष्ट्रपुरुष, स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक योगदान देणारा कोकण प्रदेश यांना अभिवादन करून कोकणच्या समृद्धीचा संकल्प करण्यासाठी गेली चार दिवस स्वराज्य भूमी कोकण यात्रा आयोजित करण्यात आली. सर्व गावातील नागरिकांनी तरुणांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी सर्वांनी कोकणच्या समृद्धीचा संकल्प केला. ही महान व्यक्तिमत्व यांचा उज्वल इतिहास जतन करताना भविष्याचा वेध घेतला पाहिजे, या राष्ट्रपुरुषांच्या गावांमध्ये जिथे स्मारके नाहीत. तिथे प्रेरणा मंदिरे उभी केली पाहिजेत, आणि या तीर्थक्षेत्रांच्या प्रेरणेतून त्या त्या भागाचा आणि गावांचा विकास व्हावा याकरता एक व्यापक अभियान राबवले पाहिजे ही संकल्पना सर्वच गावातील गावकऱ्यांनी या संकल्पनेचे स्वागत केले आणि यात सहभागी होण्याचे मान्य केले. Swarajya Bhoomi Konkan Yatra successful

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या यात्रेची सुरुवात शिरढोण, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या गावातून करण्यात आली. व समारोप भारत मातेचे तीर्थक्षेत्र रायगड किल्ल्यावर आयोजित करण्यात आला. या संपूर्ण अभियानाला संपूर्ण पाठबळ देण्याचे माझी विरोधी पक्ष नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी शुभारंभच्यावेळी घोषित केले. या समारोपाच्यावेळी कोकण विकासासाठी आणि रायगड परिसराच्या पर्यटनाच्या विकासासाठी संपूर्ण योगदान देण्याची घोषणा स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली. Swarajya Bhoomi Konkan Yatra successful

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, सरखेल कान्होजी आंग्रे महायुद्ध पेशवा बाजीराव, भारतरत्न विनोबा भावे, आधुनिक चाणक्य नाना फडणवीस, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपथ प्रतापराव गुजर भारतरत्न पा वा काणे, भारतरत्न महर्षी धोंडो कर्वे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती संभाजी महाराज कोकणातील सर्व राष्ट्रपुरुषांच्या मूळ गावाला भेट देणारी ही स्वराज्य भूमी यात्रा अतिशय यशस्वी झाली. त्या गावातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या अभिनव उपक्रमात सहभाग घेतला. त्या गावात भविष्यात इतिहासाचे जतन करणारी प्रेरणा मंदिरे आणि भविष्यात कोकण विकासाचा वेध घेणारी विकासाची मंदिरे उभारण्याच्या समृद्ध कोकण चळवळीच्या उपक्रमाला मनापासून पाठिंबा दिला. सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि याकरता एक मोठी लोक चळवळ सुरू करण्याचे मान्य केले. या संपूर्ण उपक्रमात दररोज मोठ्या प्रमाणात कोकणातील युवक, मुंबईकर, स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले. या उपक्रमात आमदार प्रवीणजी दरेकर, आमदार भरतशेठ गोगावले व आमदार शेखरजी निकम , हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया या उपक्रमात आवर्जून सहभागी झाले होते. Swarajya Bhoomi Konkan Yatra successful

अलिबाग येथे कान्होजी आंग्रे यांचे थेट वंशज रघुजी आंग्रे, झाशीच्या राणीचे वंशज राजू नेवाळकर, सावरकरांच्या आठवणी जतन करण्यामध्ये पुढाकार घेणारे बाबा साहेब तरुळेकर, तानाजी मालुसरे यांचे स्मारक उघडण्यासाठी कार्यरत चंद्रकांत कळंबे, लोकमान्य टिळकांच्या चिखलगाव मध्ये लोकमान्यचे शैक्षणिक क्षेत्रातील स्मारक उभारणारे डॉक्टर राजा दांडेकर, दापोली येथे त्या परिसरातील सर्व राष्ट्रपुरुषांचे एकत्रित स्मारक उभारणारे प्रशांत परांजपे, या संपूर्ण उपक्रमाचे समन्वय करणाऱ्या राजश्री यादवराव अशी अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आणि त्यांच्या संस्था या उपक्रमात सहभागी झाले. Swarajya Bhoomi Konkan Yatra successful

उरण परिसरात हजारो शेतकऱ्यांची जमीन न्यायालयीन लढाईतून वाचवणारे एडवोकेट धनंजय पाटील, आयटी पवई चे टॉपर आणि शास्त्रज्ञ डॉक्टर विलास मुंबईकर, पत्रकार विकास महाडिक, अभिजीत मुळे, एडवोकेट मंगेश नेने, विजय राणे, अविनाश गोगटे, विकास शेट्ये, प्रशांत संतोष ठाकूर, वीरेंद्र वडजू, कौस्तुभ सावंत, राजू भाटलेकर, समीर म्हात्रे, गणपती मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर, युयुत्सू आर्ते, सुदेश केमनाईक, किशोर सावंत, मंगेश मोरे, समीर लिंगायत, संतोष कान्हेरे, रामदास कळंबे अशा अनेक कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणी नियोजनामध्ये सहभाग घेतला. कोकणचा ऐतिहासिक ठेवा जतन करणारे आणि भविष्यातील विकासाचा वेध घेणारे एक महत्त्वपूर्ण अभियान प्रचंड यशस्वी झाले. व एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात झाली. Swarajya Bhoomi Konkan Yatra successful

