गुहागर, ता. 06 : गुहागर नगरपंचायतीचे नवे मुख्याधिकारी म्हणून पोलादपुरचे स्वप्नील चव्हाण यांनी नियुक्ती झाली आहे. पहिले सहा महिने अलिबाग नगरपरिषदेमध्ये ते परिवेक्षाधीन मुख्याधिकारी (Probation Period) होते. सप्टेंबर 2021 नंतर प्रथमच गुहागर नगर पंचायतीला कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळाले आहेत. Swapnil Chavan Guhagar’s new Chief Officer
स्वप्नील चव्हाण हे 2021 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून शासकीय सेवेत आले आहेत. पोलादपुरमधील रहीवासी असल्याने कोकणचा परिसर, येथील समस्या, कोकणी जनतेची मानसिकता यासर्वांची माहिती असलेला अधिकारी गुहागरला मिळाला आहे. गुहागर नगरपंचायतीमध्ये यापूर्वी प्रसाद शिंगटे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. गुहागर नगरपंचायतीचा विकास आराखडा मंजूरीपर्यंत नेण्याचे काम प्रसाद शिंगटे यांच्या कार्यकाळात झाले. त्यानंतर आता स्वप्नील चव्हाण मुख्याधिकारी म्हणून दिर्घकाळ गुहागरात रहातील. Swapnil Chavan Guhagar’s new Chief Officer
त्यांच्यापुढील कामांचा प्राधान्यक्रम काय असेल याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वीच नियुक्ती झाल्याने शहरातील एलईडी लाईट सुस्थितीत आणणे ही आमची प्राथमिकता होती. आज शहरात 950 हून अधिक पथदिप आहेत. त्यापैकी जवळपास 725 प्रथदिप सुरु करण्यात आम्ही यशस्व झालो आहोत. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर 6 ठिकाणी श्री गणेश मुर्तींचे विसर्जन केले जाते. तेथील प्रकाश व्यवस्थाही सुरु केली. वास्तविक महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपंचायत, नगर परिषदांमधील पथदिप देखभाल दुरुस्तीचे कंत्राट इसीएल या कंपनीकडे आहे. त्यांनी या कामासाठी आवश्यक सर्व साधनसामुग्री उपलब्ध करुन द्यायची असते. मात्र जवळपास 25 ठिकाणी आवश्यक साहित्याचा पुरवठा नगरपंचायतीने स्वखर्चाने केला आहे. उर्वरीत 225 पथदिप हे तांत्रिक कारणांमुळे चालू होऊ शकत नाहीत. याशिवाय सर्व विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलशांची सद्यस्थिती व सुधारणा, विसर्जन मार्गाची स्वच्छता अशा विविध गोष्टी नगरपंचायतीने केल्या आहेत. Swapnil Chavan Guhagar’s new Chief Officer
पुढील कालावधीत गुहागर नगरपंचायतीची सर्वात मोठी पाणी योजना परिपूर्ण प्रस्तावासह शासनाकडे पाठविणे. आणि मंजुरीनंतर तिचे क्रियान्वयन करणे हे माझे लक्ष्य आहे. तसेच गुहागर नगरपंचायतीची निवड नमो 11 या योजनेत झाली आहे. या योजनेतून पर्यटन व्यवसायाच्या वृध्दीसाठी मुलभुत सुविधांचा विकास करण्यासाठी निधी मिळणार आहे. त्यामुळे या योजनेवर अधिक भर देऊन त्यातून गुहागर शहरातील पर्यटन विकासाला निधी मिळवून देण्यावर मी भर देणार आहे. कचरा व्यवस्थापन हे कौशल्याचे काम आहे. आजही गुहागर शहरातून ओला व सुखा कचरा असे वर्गीकरण करुन कचरा संकलन होत नाही. त्यामुळे प्लास्टीक कचऱ्याची समस्या आहे. वर्गीकरण करुन कचरा संकलीत करणे आणि संकलीत कचऱ्यामधील प्लास्टीक कचऱ्याची विघटनापर्यंत व्यवस्था करणे. जेणेकरुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात आलेला कोणताच कचरा त्याच स्थितीत शिल्लक रहाणार नाही. अशी कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण करणे हे महत्त्वाचे उद्दीष्ट ठेवले आहे. अशी माहिती नुतन मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी दिली. Swapnil Chavan Guhagar’s new Chief Officer