रत्नागिरी, ता. 26 : तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘रत्नागिरी सायकलिस्ट क्लब’ने सलग तिसऱ्या वर्षी सायकल दिंडी उत्साहात काढली. यामध्ये लहान मुलांनीही सहभाग घेतला. ‘सायकल चालवूया’, ‘प्रदूषण टाळूया’, ‘पर्यावरण जपूया’, ‘तंदुरुस्त राहूया’, असा संदेश या दिंडीद्वारे देण्यात दिला. यात क्लबचे सायकलस्वार सदस्य सहभागी झाले. ‘ओम राम कृष्ण हरि’ नामगजर करत ३७ कि.मी.ची ही दिंडी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. Swami Swaroopananda Birth Anniversary
सकाळी ६.१५ वाजता जयस्तंभ येथून सायकल दिंडीला सुरवात झाली. पहाटे धुके, गुलाबी थंडी अशा वातावरणात या दिंडीला चांगला प्रतिसाद मिळाला. पावस, भाट्ये, फणसोप, वायंगणी, गोळप मार्गे पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात सकाळी ७.३० वाजता ही दिंडी पोहोचली. स्वामींचे दर्शन घेऊन पुन्हा सायकलस्वार रत्नागिरीत ९. १५ वाजता पोहोचले. Swami Swaroopananda Birth Anniversary
रत्नागिरीतून गेली अनेक वर्षे जयस्तंभ ते पावस समाधी मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात येते. या यात्रेला भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. त्या धर्तीवर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने चार वर्षांपूर्वी सायकल दिंडी काढण्याचे योजले. त्यानुसार दरवर्षी ही दिंडी जन्मोत्सवानिमित्त काढली जाते. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने सायकलस्वारांचे स्वागत करून या उपक्रमाचे कौतुक केले. ‘प्रतिवर्षी अशी दिंडी काढावी’, असेही आवाहन त्यांनी केले. Swami Swaroopananda Birth Anniversary