• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठचा तेजस्वी मार्गदर्शक हरपला

by Mayuresh Patnakar
January 13, 2023
in Guhagar
171 1
0
Suresh Gavanang from Umrath is no more

सुरेश भिकू गावणंग

335
SHARES
957
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर. ता.13 : तालुक्यातील उमराठ येथील सुरेश भिकू गावणंग या थोर समाज-रत्नाचा, विकास- पुरुषाच्या तेजस्वी पर्वाचा अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ६2 वर्षांचे होते. Suresh Gavanang from Umrath is no more

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

त्यांच्याविषयी बोलताना ग्रा. उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर म्हणाले की,  त्यांच्याबद्दल काय बोलावे तेच कळत नाही. शब्दही अपुरे पडतील. तेजस्वी चेहरा, बोलण्यात मधुरता पण भारदस्त आवाज, प्रेमळ स्वभाव, प्रसंगी कडक आणि शिस्त-बद्धता, वागण्यातही विशिष्ट अदब आणि नेहमी आस विकासाची, समृद्धतेची, समाज सेवेची, युवा पिढी सुसंस्कृत करण्याची…! बाल-वयातच वाडीच्या विकास कामाच्या मिटिंग मध्ये आपल्या आजोबांचे बोट धरून ते उपस्थित राहू लागले आणि पुढे जावून वाडीतील प्रत्येक व्यक्तीला मदतीचा हात पुढे करून त्यांना मार्गदर्शन करून घडवू लागले. वाडीतील प्रत्येक व्यक्तीला घडविण्यात त्यांचा सिहांचा वाटा आहे. Suresh Gavanang from Umrath is no more

Suresh Gavanang from Umrath is no more

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे बीज लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यत पेरले. नमन, नाटक, भजन, नाच यासारख्या अनेक कलांची त्यांना आवड व छंद होता. नमन या कोकणच्या लोककलेवर त्यांचे विशेष प्रेम होते. उमराठ गावाच्या नमन कलेमध्ये नव-नवीन विविध प्रयोग करून ती नावारूपाला आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. वाडीतील प्रत्येक व्यक्तीच्या कामाची, कलेची दखल घेवून त्याचे कौतुक करून, त्याला प्रोत्साहित करण्याचा त्यांचा हातखंडा विशेष. उमराठ गावाच्या संघटनेत व विकास कामात त्यांचा सिहांचा वाटा आहे. सभागृह बांधून, वाडीतील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सपत्नीक सत्कार करून, ते त्यांच्यातील  बाप-माणसाचे प्रत्यय देवून गेले.  Suresh Gavanang from Umrath is no more

वाडीतील कोणत्याही व्यक्तीला तत्वज्ञानासाठी बाहेरील जगातील वर-वर  दिसणाऱ्या साधू-गुरूंची कधी गरज भासली नाही. कारण त्यांनीच वाडीतील प्रत्येकाने कसे  वागावे, जीवनातील चांगल्या-वाईट गोष्टी, तत्व-ज्ञान, अध्यात्म-शिकवण दिली. यापुढे जेव्हा संघटना, विकास, माणुसकी, जिव्हाळा, स्नेह-प्रेम समाजसेवेची चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिली आठवण कै. सुरेश दादाची येईल. Suresh Gavanang from Umrath is no more

आम्हा सर्वांच्या अंधारलेल्या जीवनात “विकासाचा, संस्काराचा व ज्ञानाचा प्रकाश  पसरवून, हा  “सूर्य” अचानक डोंगराआड गेला. अशा या थोर समाज सेवकाला आपल्या ग्रामपंचायत उमराठ परिवारातर्फे विनम्र मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली. Suresh Gavanang from Umrath is no more

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSuresh Gavanang from Umrath is no moreUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share134SendTweet84
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.