• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महिला सरपंचाची आत्महत्या

by Mayuresh Patnakar
May 6, 2024
in Guhagar
509 5
1
Suicide of female sarpanch
1000
SHARES
2.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपर मधील घटना, उपचाराअंती डेरवणमध्ये मृत्यू

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील महिला सरपंच उर्वी मोरे यांनी आत्महत्या केल्याने पिंपर गावाला धक्का बसला आहे. गावात कोणताही वाद किंवा विवादास्पद कोणतीही गोष्ट घडलेली नसताना 32 वर्षीय महिला सरपंचाने आत्महत्या का केली. यापाठी अन्य काही कारणे आहेत का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. Suicide of female sarpanch

तालुक्यातील पिंपर येथील 32 वर्षीय महिला उर्वी उदय मोरे हीने 3 मे रोजी दुपारी तणनाशक औषध घेतले. औषध घेतल्याने अत्यवस्थ झालेल्या उर्वीला घरच्यांनी तातडीने श्रृंगारतळीला येथील डॉ. राजेंद्र पवार यांच्या दवाखान्यात नेले. त्यांनी तातडीने उर्वीला डेरवण येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तेथे उपचार घेत असताना 5 मे रोजी पहाटे 3.47 वाजता उर्वीचा मृत्यू झाला. उर्वीने विषारी औषध पीवून आत्महत्या केलेली असल्याची नोंद 5 मे रोजी सावर्डे पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर शुन्य क्रमांकाने या घटनेची माहिती गुहागर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास व्ही. व्ही. वायंगणकर करीत आहेत. Suicide of female sarpanch

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSuicide of female sarpanchUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share400SendTweet250
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.