इस्रोने रचला इतिहास; १०० वी मोहीम यशस्वी
श्रीहरीकोटा, ता. 30 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण वाहन जीएसएलव्ही-F15 द्वारे त्यांचे 100 वे उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले. इस्रोचं हे 100 वं ऐतिहासिक प्रक्षेपण ठरले. इस्त्रोच्या या यशाचे सर्व देशभरातून कौतुक होत असून इस्रोने X वर पोस्ट करून GSLV-F15 च्या यशस्वी प्रक्षेपणाची माहिती दिली आहे. या मोहिमेमुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवला गेला आहे. इस्त्रोचे नूतन अध्यक्ष व्ही नारायण यांच्या नेतृत्वात हे मशीन राबवण्यात आले. त्यांनी 13 जानेवारी रोजी पदभार सांभाळला होता. Successful launch of NVS-02 navigation satellite
स्वदेशी क्रायोजेनिक स्टेज असलेल्या जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल (GSLV) ने त्याच्या 17 व्या उड्डाणात, नेव्हिगेशन उपग्रह NVS-02 वाहून नेले आणि 29 जानेवारी रोजी सकाळी 6.23३ वाजता येथील दुसऱ्या लाँच पॅडवरून उड्डाण केले. हा नेव्हिगेशन उपग्रह ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन’ (नाविक) मालिकेतील दुसरा उपग्रह आहे. इस्त्रोने मोहिम फत्ते केल्यावर अंतराळ संशोधन संस्थेवर कौतुकाचा वर्षाव झाला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोचे अभिनंदन केले. श्रीहरिकोटा येथून 100 वे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल त्यांनी इस्त्रोचे कौतुक केले. टीम ISRO, तुम्ही पुन्हा एकदा GSLV-F15 / NVS-02 मोहिम फत्ते करून देशाचा गौरव केल्याचे सिंह म्हणाले. Successful launch of NVS-02 navigation satellite
जीएसएलवी-एफ15 भारताच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (जीएसएलवी) चे हे 17 वे उड्डाण होते. इंडिजिनियस क्रायो स्टेजसह हे 11 वे उड्डाण होते. तर इंडिजिनियस क्रायोजेनिक स्टेजसह जीएसएलवीचे हे 8 वे ऑपरेशनल फ्लाईट होते. जीएसएलवी-एफ15 पेलोड फेअरिंग एक मेटेलिक व्हर्जन आहे. इंडिजिनियस क्रायोजेनिक स्टेजचे जीएसएलवी-एफ15 एनवीएस-02 हा सॅटेलाइट, जियोसिंक्रोनस ट्रांसफर ऑर्बिट, त्या कक्षेत स्थापित करण्यात आल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. विशेष अनेक विद्यार्थ्यांना लाँचपॅडजवळ सॅटेलाईट प्रक्षेपण अनुभवायला मिळाले. इतक्या जवळून सॅटेलाईटचे प्रक्षेपण पाहायला मिळाल्याने भविष्यातील वैज्ञानिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. विद्यार्थ्यांनी त्यांचा आनंद यावेळी टाळ्या वाजवून व्यक्त केला. Successful launch of NVS-02 navigation satellite