खोडदे शाळेतील विद्यार्थांचे मंथन परीक्षेत उज्वल यश
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नंबर १ या शाळेतील विद्यार्थी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षा मध्ये मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान व ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत उत्तम गुण व मेडल मिळवून राज्यात व केंद्रात उत्तीर्ण झाले आहेत. Success of students of Khodde School in Manthan Exam

जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नंबर १ या शाळेतील कु. भुषण लवटे हा विद्यार्थी IAS परिक्षेत ९२ गुण मिळवून राज्यात पाचवा व केंद्रात पहिला, मंथन परिक्षेत ११८ गुण मिळवून राज्यात १७ वा व केंद्रात पहिला तर BDS परिक्षेमध्येही ९० गुण मिळवत सिल्वर मेडल पटकावले आहे. तसेच सुयश गणेश पाटील, अन्विका संग्राम पाटील, जानवी कोळी, आर्वी राठोड, स्पर्श साळवी, आदिती साळवी हे विद्यार्थी व विद्यार्थीनी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परिक्षेत उज्वल यश संपादन करुन यशस्वी झाले आहेत. Success of students of Khodde School in Manthan Exam

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिपमध्ये इयत्ता १ ली मधील कु. भुषण लवटे, सुयश गणेश पाटील, अन्विका सग्राम पाटील, इयत्ता २ री मधील जानवी कोळी, आर्वी राठोड, स्पर्श साळवी, अदिती साळवी, इयत्ता ४ थी मधील आराध्या बागकर, सुयोग साळवी या विद्यार्थांनी उज्वल यश संपादन करुन चमकले आहेत. Success of students of Khodde School in Manthan Exam

या यशस्वी विद्यार्थांचे मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं.१ या शाळेचे शालेय कमिटी अध्यक्ष श्री. संदेश साळवी, उपाध्यक्षा सौ. अपर्णा साळवी, शिक्षणतज्ञ श्री. विलास गुरव, सौ. शर्वरी साळवी, सौ. समृध्दी साळवी, सौ.सुषमा पांचाळ, सौ. निशा पांचाळ, सौ. संजना गुरव, सौ. लवटे, सौ. पाटील, श्रीमती.साळवी, सौ. जाधव, मुख्याध्यापक लोणारे, कु.पुजा गुरव यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस मनपुर्वक भरभरुन शुभेच्छा दिल्या. Success of students of Khodde School in Manthan Exam

