समृध्दी आंबेकर, हर्षदा पालकर प्रथम तर जान्हवी विचारे द्वितीय
गुहागर, ता. 08 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या विद्यालयात नुकत्याच या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयाने सुयश संपादन केले आहे. Success of Patpanhale School in the competition

प्राथमिक गट – इ.५ वी ते ७ वी, माध्यमिक गट- इ. ८ वी ते १० वी व उच्च माध्यमिक गट -इ. ११ वी व १२ वी या तीन गटांमध्ये घेण्यात आल्या होत्या. गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्राथमिक गटासाठी – “माझा आवडता समाज सुधारक”, माध्यमिक गटासाठी “भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे ” व उच्च माध्यमिक गटासाठी “माझा भारत – माझे संविधान ” हे विषय देण्यात आले होते. Success of Patpanhale School in the competition
सदर स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातील प्राथमिक गटातील इयत्ता ७ वीमधील विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने “माझा आवडता समाज सुधारक – स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर “या विषयावर निबंध सादर करून प्रथम क्रमांक संपादन केला आहे. माध्यमिक गटामध्ये कु. हर्षदा संदीप पालकर – इयत्ता १० वी – “भारतीय स्वातंत्र्याची ७५वर्षे ” हा निबंध सादर करून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक संपादन केला आहे. तसेच उच्च माध्यमिक गटातील ११ वी वाणिज्य शाखेमधील विद्यार्थिनी कु. जान्हवी प्रफुल्ल विचारे हिने “माझा भारत – माझे संविधान ” या विषयावर निबंध सादर करून तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. Success of Patpanhale School in the competition
गुहागर तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयाने सुयश संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिताताई वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापक एम.ए. थरकार, गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच पाटपन्हाळे विद्यालयाचे शिक्षक वृंद – शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुयशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. Success of Patpanhale School in the competition
