• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 March 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाचे सुयश

by Ganesh Dhanawade
January 31, 2023
in Guhagar
68 1
0
Success of Patpanhale School
134
SHARES
383
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तालुकास्तरीय प्राथमिक गटात समृद्धी आंबेकर प्रथम

गुहागर, ता. 31 : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यालय कोतळूक येथे नुकतीच तालुकास्तरीय हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेने सुयश संपादन केले आहे. Success of Patpanhale School

गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी प्राथमिक विभाग गट क्रमांक – १ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विद्यालयातील इयत्ता सातवीमधील विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. इयत्ता आठवी ते दहावी या माध्यमिक विभागातील गटात कु. तन्वी संतोष गावडे (इयत्ता – नववी) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. इयत्ता अकरावी ते बारावी या उच्च माध्यमिक गटात क्रमांक ३ मध्ये कु. साक्षी विजय पवार (अकरावी – वाणिज्य शाखा) हिने तृतीय क्रमांक संपादन केला आहे. Success of Patpanhale School

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

सदर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख व मराठी विषय शिक्षिका सौ. एस.एस. चव्हाण, श्री. एस.एम. आंबेकर, प्रा. सौ.एम.एस. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तालुकास्तरीय हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेतील सुयशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक एम.ए. थरकार , शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Success of Patpanhale School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSuccess of Patpanhale SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.