मेघा तांबे, आर्यन गोरीवले, सार्थक रांबाडे विद्यार्थी ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 15 : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झालेल्या हॅकेथॉन स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा मुर्तवडे नं. २ कातळवाडी या शाळेने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शाळेचे विद्यार्थी कु. आर्यन विनोद गोरीवले, कु. सार्थक संदिप रांबाडे, कु. मेघा चंद्रकांत तांबे या विद्यार्थांनी सहभागी होऊन आपल्या कुशल बुद्धीने नेत्रदीपक यश संपादन केले. या विद्यार्थांची पुणे येथे होणाऱ्या हॅकेथॉन स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. Success of Murtawade Katalwadi School in Hackathon competition


प्रत्येक विद्यार्थांच्या अंगी असणाऱ्या कलात्मक, अभ्यासात्मक गुणांना व्यासपीठ देणारा उपक्रम, नव – नवीन कल्पनांना आकार देण्यासाठी विद्यार्थांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करणे, बुध्दीवैभव आणि नव्या विचारांचे दर्शन घडविण्यासाठी आयोजित करण्यात येणारी स्पर्धा म्हणजे हॅकेथॉन स्पर्धा या स्पर्धेतून तंत्रज्ञान शोध घेणे तसेच दैनंदिन कामकाजात नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे यावर काम करणारे न्यायाधीशांचे पॅनल यातूनच या विजेत्या विद्यार्थांची निवड करण्यात येते. Success of Murtawade Katalwadi School in Hackathon competition


या विद्यार्थांच्या यशामागे मुख्याध्यापक अनंत शिगवण, सहा. शिक्षिका कोहळे मॅडम, सुप्रिया धामापूरकर, सहा. शिक्षक मनोज खामकर यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थांचे शालेय शिक्षक वृंद, समस्त कातळवाडी ग्रामिण – मुंबई सेवा मंडळ व शाळा व्यवस्थापन कमिटी तर्फे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून शुभेच्छा देण्यात येत आहेत. Success of Murtawade Katalwadi School in Hackathon competition