• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जीवन शिक्षण शाळेतील विद्यार्थ्यांचे यश

by Ganesh Dhanawade
July 12, 2022
in Guhagar
17 0
0
Success of Jivan Education School
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जवाहर नवोदयच्या प्रवेश परिक्षेत 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

गुहागर, ता. 12 : जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 या शाळेत 2021 – 22 मध्ये जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा घेण्यात आली. या प्रवेश परिक्षेत तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. अशी कामगिरी करणारी जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 ही एकमेव शाळा आहे.  Success of Jivan Education School

प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय चालवले जाते. या विद्यालयात जिल्ह्यातील हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी प्रवेश परिक्षा घेतला जाते. या प्रवेश परिक्षेत गुणवत्ता यादीत येणे. हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आवाहनात्मक असते. प्रवेश परिक्षेची तयारी विद्यार्थ्यांन कडून करून घेणे. यात शिक्षकांची देखील कसोटी असते. या पाश्वभूमीवर जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 या विद्यार्थी व शिक्षकांनी मिळवलेले यश कौतूकास्पद आहे. Success of Jivan Education School

जीवन शिक्षण शाळेतील इ. 5 वी मधील स्वराज विक्रम शिंदे, अनिकेत अविनाश सावंत, सत्यजीत जयेंद्र सानप या विद्यार्थ्यांनी  जवाहर नवोदय परिक्षेत यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक श्री. अमोल धुमाळ यांनी मार्गदर्शन केले होते. Success of Jivan Education School या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गुहागर तालुक्याच्या मा. गटविकास अधिकारी श्रीम.  भागवत मॅडम, विस्तारअधिकारी श्री. मुकुंद कासारे, गुहागर केंद्राचे केंद्रप्रमुख लोहकरे यांनी अभिनंदन केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 व शाळेतील सर्व शिक्षकवृद यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. Success of Jivan Education School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSuccess of Jivan Education SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.