गुहागर, ता. 31 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रीदेव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. Success of Guhagar High School in Oratory Competition


गुहागर तालुक्यातील शृंगारी उर्दू हायस्कूल येथे नुकतीच ही वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक गटात कु. आर्या गणेश झगडे – प्रथम क्रमांक, माध्यमिक गटात कु. शर्वरी जनार्दन देवकर – तृतीय तर उच्च माध्यमिक गटात कु. रिया रविंद्र डिंगणकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. Success of Guhagar High School in Oratory Competition


या यशस्वी विद्यार्थिनींचे गुहागर एज्युकेशन सोसायटीचे CEO व शाळा समिती अध्यक्ष मा श्री दिपक कनगुटकर, मा मुख्याध्यापक श्री एस एस कांबळे, पर्यवेक्षिका सौ एस एस कांबळे मॅडम, श्री एम एस गंगावणे सर यांनी कौतुक व अभिनंदन केले. तसेच संस्था व शाळेच्या वतीने यशस्वी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. Success of Guhagar High School in Oratory Competition

