गुहागर, ता. 14 : राज्य स्तरावरावरून दि. 21 डिसेंबर 2022 रोजी एनएमएमएस परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे. Success of Guhagar High School in NMMS Exam
या परीक्षेत बाबासाहेब शुभम बांगर, समर्थ प्रविण तोडणकर, आलेख श्रीपाद परांजपे, अनघा अभय साटले, समर्था मंदार मोरे, सनिष्का बळवंत रोहिलकर, सान्वी दिनेश विचारे, आर्या राजेश तुळसुणकर, नेनेस्का पराग खडपे, पार्थ लहू नाटेकर, अनुज संदेश मोरे या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. Success of Guhagar High School in NMMS Exam
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, सौ. बाणे, महेश दिक्षीत, कृपाल परचूरे व इतर शिक्षकांनी अभिनंदन केले. Success of Guhagar High School in NMMS Exam