पालकमंत्री यांच्या आदेशाने दुरुस्तीचे काम सुरू; युवासेनेच्या मागणीला यश
गुहागर, ता. 24 : चिपळूण-गुहागर या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत गुहागर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. युवासेनेच्या या मागणीची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चिपळूण-गुहागर मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. Success for Yuva Sena’s demand
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही केल्याबद्दल गुहागर युवासेनेच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच चिपळूण व गुहागर परिसरातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. Success for Yuva Sena’s demand
यावेळी गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, गुहागर तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, शहरप्रमुख निलेश मोरे, चिपळूण तालुकाप्रमुख रुपेश घाग, गुहागर विधानसभा संपर्कप्रमुख सागर गुजर, अमरदीप परचुरे, विक्रांत चव्हाण, प्रणय घाग, चिपळूण तालुका संघटक ऋषिकेश साळवी, कुणाल देसाई, मंगेश मते, अमोल गोयथळे यांच्यासह युवावर्ग उपस्थित होता. Success for Yuva Sena’s demand
