पाटपन्हाळे महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची फी भरली
गुहागर, ता. 20 : पाटपन्हाळे महाविद्यालयाचे प्रा. सुभाष खोत यांनी सामाजिक बांधिलकी जपत यंदाही तीन गरजू विद्यार्थ्यांची संपूर्ण वार्षिक शैक्षणिक फी भरून प्रेरणादायी उपक्रम राबविला. एकूण २३ हजार ५०० रुपयांची फी प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या उपस्थितीत भरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोलाचे आर्थिक पाठबळ दिले. Subhash Khot helps needy students
आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने प्रा. खोत अनेक वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून प्राचार्य डॉ. देसाई यांनी त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचे अभिनंदन केले. Subhash Khot helps needy students
