गुहागर पत्रकार संघाचा यांना स्व. सुभाष गोयथळे पुरस्कार जाहीर
गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या स्व. सुभाष गोयथळे कार्य गौरव पुरस्कारासाठी यावर्षी मनसेचे माजी तालुकाप्रमुख राजेश रमेश शेटे यांचे नाव जाहीर झाले आहे. शनिवार, 15 एप्रिलला या पुरस्काराचे वितरण होणार आहे. Subhash Goythale Award of Journalist Union announced
गुहागर पत्रकार संघातर्फे गेली 6 वर्ष विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तालुक्यातील व्यक्तींना स्व. सुभाष गोयथळे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी कै. गजानन बेंडल, उद्योजक राजन दळी, माजी सरपंच यशवंत बाईत, रुग्णांना साह्य करणारे गफार मेमन, व्यापारी नासीम मालाणी, मुकुंद तथा नाना पाटणकर यांना हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते. Subhash Goythale Award of Journalist Union announced

2019 मध्ये गुहागर पत्रकार संघाचे संस्थापक विनोद घाडे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर देशासमोर कारोना महामारीचे संकट उभे राहीलेत्यामुळे गेल्या तीन वर्षात पत्रकार संघाला मोठा कार्यक्रम घेता आला नव्हता. या काळात गुहागर तालुका पत्रकार संघाचे सामाजिक काम सुरु होते. कोरोना काळात गुहागर शहरात रहाणाऱ्या परप्रांतीयांच्या 25 कुटुंबाना महिनाभराचे अन्न धान्य पत्रकार संघाने पुरवले. निर्बंधांच्या काळात कँन्सरग्रस्त 8 रुग्णांना उपचारासाठी मुंबई, कोल्हापूर, हैद्राबाद या ठिकाणी जाण्यासाठी, तसेच 30 अडकलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी मोफत पास काढून दिले. या कामात तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सहकार्य केले. रक्ताची आवश्यकता लक्षात घेवून सलग 3 वर्ष मराठी पत्रकार दिनी रक्तदान शिबिर आयोजित केले. चिपळूणयेथील महापूरामुळे संकटात सापडलेल्या 6 पत्रकार कुटुंबाना मदत केली. एस.टी.च्या प्रदिर्घ संपातही गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा शिधा देणारा गुहागर तालुका पत्रकार संघ होता. या कामाची दखल घेत मराठी पत्रकार परिषदेने गंगाखेड (जि. परभणी) येथे वसंतराव काणे आदर्श पत्रकार संघ असा पुरस्कार देवून गुहागर तालुका पत्रकार संघाचा गौरव केला होता. Subhash Goythale Award of Journalist Union announced
या सोहळ्यात मनसेचे माजी गुहागर तालुका प्रमुख राजेश शेटे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण रुग्णालय गुहागर येथील कोरोना कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सलग ३ महिने स्व खर्चाने जेवणाचे डबे उपलब्ध करुन दिले. याशिवाय कोरानाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारांसाठी गुहागर नगरपंचायतीला जळावू लाकडे उपलब्ध करुन दिली. त्यांच्या या कार्याबद्दल राजेश रमेश शेटे यांना स्व. सुभाष गोयथळे कार्य गौरव पुरस्कार देण्याचे गुहागर तालुका पत्रकार संघाने निश्चित केले आहे. 15 एप्रिल 2023 रोजी जाहीर कार्यक्रमात पुरस्कार देण्यात येणार आहे. Subhash Goythale Award of Journalist Union announced
