लोकशिक्षण मंडळ आबलोलीने केला माजी विद्यार्थ्याचा सत्कार
आबलोली, ता. 02 : गुहागर (Guhagar) तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली. या प्रशालेचा माजी विद्यार्थी सुशील बबन काजरोळकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली. त्याबद्दल लोकशिक्षण मंडळाच्या वतीने कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम अनंतरावजी गीते कौशल्य विकास संकुल सभागृह आबलोली येथे नूकताच पार पडला. Sub-Inspector of Police Kajrolkar
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सुशील काजरोळकर यांनी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेली मेहनत, अपार कष्ट, कुटुंबाची साथ याविषयी माहिती दिली. तसेच सत्कारमूर्ती सुशील काजरोळकर यांनी आपल्या जडणघडणीत आई-वडिल, भाऊ-बहीण यांच्या इतकाच वाटा लोक शिक्षण मंडळाचा व आपल्या विद्यालयाचा असल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. Sub-Inspector of Police Kajrolkar
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत बाईत यांनी काजरोळकर यांचे प्रतिकूल परिस्थितीत मेहनत घेऊन पोलीस उपनिरीक्षक पदी पोहोचल्या बद्दल तोंड भरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी निश्चित उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यासात स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहनही केले. कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत, कोषाध्यक्ष रमाकांत साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत, सेक्रेटरी राकेश साळवी, संचालक अविनाश कदम, कृष्णा पालशेतकर, सुषमा उकार्डे, मुख्याध्यापक डी.डी. गिरी, काजरोळकर कुटुंबीय, शाळा महाविद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. एस. जे. व्हनमाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. Sub-Inspector of Police Kajrolkar