गुहागर, ता. 15 : कोकणभूमी प्रतिष्ठान ग्लोबल कोकण या संस्थेच्या माध्यमातून कोकणातील कृषी प्रकल्पाचा अभ्यास दौरा शुक्रवार दिनांक 24 मे ते रविवार दिनांक 26 मे 2024 दरम्यान श्रीवर्धन गुहागर दापोली आदी परिसरात अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. कोकणातील कृषी प्रकल्पाच्या अभ्यास दौऱ्यातून ज्या ज्या कोकणवासीयांच्या कोकणात जमिनी आहेत किंवा ज्या कोकणवासीयांना कोकणात गुंतवणूक करून प्रकल्प उभारायचे आहेत. अशांसाठी दरमहा कोकणातील कृषी प्रकल्पाचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. Study tour of agricultural project
पर्यटन उद्योग, कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन, आंबा, फलोद्यान, फळ प्रक्रिया, वनौषधी प्रक्रिया, भाजीपाला लागवड, मसाला शेती व प्रक्रिया, बांबू लागवड, कोळंबी शेती, मत्स्योद्योग, क्रोकोडाइल सफारी, हाऊस बोट असे अनेक प्रकल्प या अभ्यास दौऱ्यात पाहता येतील व ज्यांनी हे प्रकल्प केलेत अशा यशस्वी उद्योजकांकडून या प्रकल्पाची माहिती, त्याच्यासाठी लागणारी गुंतवणूक, त्याचे अर्थशास्त्र, त्यांचे अनुभव हे सर्व समजून घेता येईल. यातून प्रत्येकाला स्वतःचा प्रकल्प उभारण्यासाठी निश्चित दिशा मिळू शकेल. या अभ्यास दौऱ्यात डॉक्टर चंद्रकांत मोकल, श्री.विनायक महाजन, श्री अरविंद अमृते, श्री महादेव महाजन, श्री.धनंजय जाधव इत्यादी अनेक मान्यवर व यशस्वी शेतकरी तज्ञ यांचे मोलाचे मार्गदर्शन या अभ्यास दौऱ्यातून मिळेल. Study tour of agricultural project
मुंबई पुणे जगभरातील प्रस्थापित कोकणवासीयानी आपल्या गावात गुंतवणूक करून उद्योग कसे निर्माण करता येतील. याकरता सुनियोजित आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करायला हवेत. कोकणातील पर्यटन उद्योग, मस्योद्योग आणि आधुनिक शेती याविषयी आधुनिक तंत्रज्ञानाने अवलंबलेल्या शेतीच्या विविध पद्धती व त्या अंतर्गत झालेली उत्पन्नामधील वाढ त्या दृष्टीने प्रत्यक्ष प्रकल्पावर जाऊन प्रकल्पाची माहिती घेणे. या अभ्यास दौऱ्यात सहभागी होणाऱ्याना निश्चितच दिशा व मार्गदर्शन मिळेल. ज्यांना कोकणात स्वतःचे प्रकल्प सुरू करायचे आहेत. त्यांना सर्व माहिती एकाच कार्यक्रमातून मिळू शकते. अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त उपक्रम तीन दिवसात सर्व माहिती एकत्रित मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. Study tour of agricultural project
तरी या अभ्यास दौऱ्यात ज्यांना सहभागी व्हायचे असेल. त्यांनी 9082550774 / 8779842009 / 9768458073 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आव्हान कोकणभूमी प्रतिष्ठान, ग्लोबल कोकण यांच्या वतीने करण्यात येत आहे. Study tour of agricultural project