कातळावरील दूर्मिळ वनस्पतींचा उपपरिसरातील विद्यार्थ्यांकडून अभ्यास
रत्नागिरी, ता. 30 : मुंबई विद्यापीठ चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर पर्यावरणशास्त्र विभागामार्फत कातळ पठारावरील क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी संशोधक डॉ अरूण चांदोरे, संशोधक डॉ कुमार विनोद गोसावी व पर्यावरणशास्त्र विभागाचे डॉ पांडुरंग पाटील हे या सर्वक्षेत्रभेटी दरम्यान उपस्थित होते. Study of rare plants by students


विभागातील एमएससी पर्यावरणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना पठारावरील वनस्पती विविध प्रजातींची सखोल माहिती यावेळी देण्यात आली. या निमित्ताने उपपरिसराचे सहाय्याक कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांच्या हस्ते पठारावर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच नव्याने शोध घेण्यात आलेल्या वनस्पतींच्या संशोधनात्मक अभ्यास करण्याकरितांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले. विविध प्रजातींचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून त्यांचा समाजोपयोगी कार्याकरतिचा वापर होण्याचे मत उपस्थितांद्वारे व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना कैशल्यपूर्ण शिक्षण प्रदान करणे व त्यांना वैज्ञानिक संशोधनास सक्षम करणे असे भाव सहय्यक कुलसचिव अभिनंदन बोरगावे व प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर यांनी व्यक्त केले. Study of rare plants by students

