संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 07 : गुहागर डेपो मधुन दुपारी ०१:३० वाजता सुटणारी मुंबई तवसाळ ही एस. टी. गाडी आबलोली मध्ये दुपारी ०३ वाजता येते व सायंकाळी ०४ वाजता तवसाळ येथे पोहचते तरी या एस. टी. च्या वेळेत थोडा बदल करुन हि एस. टी. गुहागर मधूनच दुपारी ०२:३० वाजता सुटली तर आबलोली मध्ये सायंकाळी ०४ वाजेपर्यंत पोहचेल किंवा तवसाळ येथे हिच एस. टी. एक तास थांबते त्याऐवजी ०३ ते ०४ या वेळेत एक तास आबलोली येथे थांबून शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन गेली तर त्यामुळे मासू, आवरे फाटा, जांभारी, सडेजांभारी, कुडली पडवे, तवसाळ या ग्रामिण भागातून आबलोली येथे शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या जवळ पास २५ ते ३० विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल आणि शैक्षणिक नुकसान टळेल. Students will benefit if the bus leaves late
तालुक्यातील लोक शिक्षण मंडळ आबलोली संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आबलोली येथे मासू, आवरे फाटा, जांभारी, सडेजांभारी, कुडली, पडवे, तवसाळ या मार्गावरून शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या २५ ते ३० विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेप्रमाणे सुट्टीचे दिवस सोडून सकाळी १०:१० वाजता शाळा भरते व सायंकाळी ०४:१० शाळा सुटते परंतू शाळा सुटल्यानंतर ब-याच विद्यार्थ्यांना वेळेत घरी जाण्यासाठी परतीचा प्रवास करताना गैरसोय होते. यात वेळ व पैसा खर्च होतो व शैक्षणिक नुकसान होते. या विद्यार्थ्यांना सायंकाळी ०६ ते ०६:३० पर्यंत आबलोली येथेच एस. टी. ची वाट बघत थांबावे लागते. यामध्ये विद्यार्थ्यांचा रोजचा साधारण दोन तास वेळ वाया जातो. Students will benefit if the bus leaves late
तरी विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी मुंबई – तवसाळ या गाडीची वेळ बदलून गुहागर मधून दुपारी ०२:३० वाजता सोडून आमच्या विद्यालयास सहकार्य करावे, असे विनंती वजा लेखी पत्र गुहागर तालुक्यातील आबलोली येथील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आबलोली यांचे मुख्याध्यापक श्री. डि.डि.गीरी यांचे सहिने देण्यात आले आहे. त्यामुळे आबलोली पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. Students will benefit if the bus leaves late