• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रिगलच्या विद्यार्थीनींनी दिली प्रा. आरोग्य केंद्राला भेट

by Ganesh Dhanawade
August 22, 2023
in Guhagar
79 1
0
Students visited the primary health center
155
SHARES
443
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील शृंगारतळीच्या रिगल कॉलेज मधील नर्सिंगच्या विद्यार्थीनींनी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉ. शशिकला गायकवाड, अधीपरिचारिका श्रीमती कांचन, आरोग्यसेवक श्री. कुंभार उपस्थित होते. त्यांनी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या विभागांची माहिती दिली. Students visited the primary health center

Students visited the primary health center

त्यामध्ये बाह्यरुग्ण विभाग, परिचारिका कक्ष, ऑपरेशन थिएटर, फार्मसी तसेच जनरल वॉर्ड, मेडिसिन स्टोअर रूम, इंजेक्शन-ड्रेसिंग रूम या विभागांमध्ये काम कसे चालते याचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले. लॅबोरेटरिजमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या टेस्टिंग, त्यांच्या मशीन्स आणि त्यांचा वापर या संदर्भात मार्गदर्शन केले. या प्रत्यक्ष भेटीमुळे विद्यार्थीनीना मेडिसिन साहित्य आणि वेस्ट मॅनेजमेंट याची माहिती मिळाली. Students visited the primary health center

तसेच विद्यार्थिनींच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजय शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के, रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे, नर्सिंग केयरच्या प्रा. सौ. साक्षी मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. Students visited the primary health center

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarStudents visited the primary health centerUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share62SendTweet39
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.