• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर विद्यार्थ्यांनी दिली तारापूर अणुऊर्जा प्रकल्पास भेट

by Ganesh Dhanawade
April 24, 2023
in Guhagar
92 1
0
Students visited Tarapur Nuclear Power Plant
180
SHARES
515
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अभियांत्रिकीतील विद्युत विभागाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

गुहागर, ता. 24 :  तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Valaneshwar) मधील विद्युत अभियांत्रिकी विभागाने तारापूर अणुऊर्जा केंद्र युनिट ३ आणि ४ येथे एक दिवसीय औद्योगिक भेटीचा अभ्यास दौरा केला. दि. ५ एप्रिल २०२३ रोजी विद्युत विभागातील तृतीय व अंतिम वर्षाच्या एकूण ३८ विद्यार्थ्यांनी या अभ्यास दौरात सहभाग नोंदविला. Students visited Tarapur Nuclear Power Plant

सुरुवातीला विद्यार्थ्यांना त्याठिकाणी ऍनिमेटेड व्हिडीओ आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, एकूणच अणुऊर्जा म्हणजे काय, त्याद्वारे वीज कशी निर्माण केली जाते याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना तारापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाचे एक प्रोटोटाइप मॉडेल दाखवण्यात आले. तसेच डॉ. होमी भाभा यांच्यावरील डॉकेमेंटरी सुद्धा दाखवण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना अणुऊर्जा प्रकल्पाची कंट्रोल रूम, टर्बाईन आणि जनरेटर सिस्टीम इत्यादी अतिशय सविस्तर आणि इत्यंभूत रित्या दाखवले गेले. सर्वात शेवटी विद्यार्थ्यांना गॅस इन्सुलेटेड हायटेन्शन (उच्चदाब) स्वीटचार्ड दाखवण्यात आले. गॅस इन्सुलेटेड स्वीचयार्डचे फायदेही समजावून सांगितले गेले. तिथे तारापूरच्या अणुऊर्जा प्रकल्प कंपनीकडून श्री. प्रशांत राऊत हे समन्वयक आणि मार्गदर्शक म्हणून लाभले. Students visited Tarapur Nuclear Power Plant

आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी पाठ्यपुस्तक आणि वर्गातील शिकवणी सोबतच अनेक असंख्य उपक्रम राबवण्यात सदर अभियांत्रिकी महाविद्यालय कायमच अग्रेसर राहिलेले आहे. प्रस्तुत भेट ही त्याच उपक्रमाचा एक भाग आहे. सदर अभ्यास दौराच्या यशस्वीतेकरिता विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी आणि विद्युत विभागप्रमुख श्री. सतिश घोरपडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. Students visited Tarapur Nuclear Power Plant

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarStudents visited Tarapur Nuclear Power PlantUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.