पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली गुहागर बाजाराला भेट
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष वाणिज्य वर्गाच्या विद्यार्थ्यांनी येथील संत तुकाराम मध्यवर्ती ग्राहक सहकारी भांडार संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या गुहागर बाजाराला भेट दिली. Students visited Guhagar Bazaar
विद्यार्थ्यांना सहकाराची माहिती व्हावी, तसेच प्रत्यक्ष व्यवसायाची माहिती व्हावी आणि प्रॅक्टिकल ज्ञान मिळावे या हेतूने वाणिज्य विभागातर्फे या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम गुहागर बाजारातील वेगवेगळ्या विभागांची माहिती घेतली. प्रामुख्याने गुहागर बाजाराचे असणारे मार्केटिंग, तिथले असणारे कर्मचारी वर्ग, संग्रहण, मालसाठा व्यवस्थापन, खरेदी आणि ग्राहक संबंध व्यवस्थापन यांची माहिती घेतली. ही सर्व माहिती प्रामुख्याने तेथील व्यवस्थापक श्री. गणेश खैरे आणि सौ. खैरे तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी दिली. विद्यार्थ्यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर या संस्थेचे संचालक राजेश बेंडल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना भविष्यात करावयाच्या गोष्टी तसेच इतर गोष्टीबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अनुभवातून कसे शिकावे आणि आपला आर्थिक विकास कसा साध्य करावा या संदर्भात माहिती दिली. Students visited Guhagar Bazaar
संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे यांनी विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन करताना या संस्थेचा 1983 पासूनचा इतिहास सांगितला. कोकणामध्ये सहकार क्षेत्र कठीण असताना देखील सहकारामार्फत गुहागर बाजार कसा कसा चालवला याचे विवेचन केले. आणि विद्यार्थ्यांनी मुंबईला न जाता इथेच राहून व्यवसाय करण्याची कल्पकता आणि जिद्द दाखवावी. गुहागर सारख्या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना करियर साठी अनेक मोठ्या संधी आहेत, त्याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन केले. यावेळी गुहागर बाजाराचे श्री. वैभव आदवडे, महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत, सुभाष घडशी उपस्थित होते. Students visited Guhagar Bazaar