• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरवासीयांनी अनुभवले खंडग्रास सुर्यग्रहण

by Mayuresh Patnakar
October 27, 2022
in Guhagar
18 0
0
Students seen Solar Eclipse in Guhagar

सुर्यग्रहण पहाणारे विद्यार्थी

35
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आयुकाचा उपक्रम, सुर्यग्रहणाची माहिती दिली

गुहागर, ता. 27 : Students seen Solar Eclipse in Guhagar  येथील समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थ्यांसह तालुक्यातील अनेक खगोलप्रेमींनी  मंगळवारी 25 ऑक्टोबरला झालेल्या खंडग्रास सुर्यग्रहण प्रत्यक्ष अनुभवले. तसेच देशातील विविध ठिकाणाहून हे सुर्यग्रहण (Solar Eclipse)  कसे दिसते याचे थेट प्रक्षेपणही पाहिले. आयुकाच्या सौ. शिवानी काणे आणि युनायटेड इंग्लिश स्कुल चिपळूणमधील भुगोल शिक्षक दिपक  आंबवकर यांनी हा उपक्रम गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर (Guhagar Beach) आयोजित केला होता. Students seen Solar Eclipse in Guhagar

दिवाळीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी खंडग्रास सुर्यग्रहण होते. हे सुर्यग्रहण पहाता यावे म्हणून आयुकाच्या (IUCAA) सौ. शिवानी पेठे, युनायटेड इंग्लिश स्कुल चिपळूणमधील भुगोल शिक्षक दिपक आंबवकर आपल्या सहकाऱ्यांसह विशिष्ट दुर्बिण (Telescope) घेऊन गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आले होते. या दुर्बिणीला स्मार्ट फोन जोडण्यात आला होता. या फोनवर स्पष्टपणे सुर्यग्रहण पहाता येत होते. त्याचबरोबर आयुकाने सुर्यग्रहण पहाण्यासाठीचे चष्मे देखील उपस्थितांना मोफत दिले. Students seen Solar Eclipse in Guhagar

गुहागर न्यूजने (Guhagar News) या उपक्रमाची माहिती गुहागर तालुकावासीयांपर्यंत पोचवली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना घेवून पालक मंगळवारी (ता. 25) सायंकाळी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आले होते. या विद्यार्थ्यांनी तासभर समुद्रावर थांबून खंडग्रास सुर्यग्रहण प्रत्यक्ष अनुभवले. यावेळी आयुकाच्या मुक्तांगण विज्ञान शोधिकेत काम करणाऱ्या सौ. शिवानी काणे यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थित नागरिकांना सुर्यग्रहण कसे लागते याची माहिती दिली. आयुकाच्या युट्यूब पोर्टलवर देशातील 6 ठिकाणी दिसणाऱ्या सुर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण सुरु होते. शिवानी काणे यांनी हे प्रक्षेपणही विद्यार्थ्यांना दाखविले. त्यावेळी गुहागरमधुन दिसणाऱ्या सुर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपणही सर्वांना पहाता आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. Students seen Solar Eclipse in Guhagar

या उपक्रमाबाबत सौ. काणे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आयुका (आंतरविद्यापिठ केंद्र – खगोलविज्ञान आणि खगोलभौतिक) या संस्थेतर्फे विविध उपक्रम आयोजित केले जातात. याच उपक्रमाचा भाग म्हणून आयुकाने सुर्यग्रहणाचे प्रक्षेपण करण्यासाठी गुहागरचा समुद्रकिनारा निवडला होता. चिपळुणचे दिपक आंबवकर म्हणाले की, ग्रहणाबाबत सुशिक्षित लोकांमध्येही गैरसमज आहेत. हे दूर करण्यासाठी ग्रहण या खगोलीय घटनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मी या उपक्रमात सहभागी झालो आहे. आज गुहागरच्या समुद्रावर बहुसंख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित आहेत. याचा आम्हांला आनंद आहे. Students seen Solar Eclipse in Guhagar

Students seen Solar Eclipse in Guhagar

हे ग्रहण पाहिल्यानंतर कु. समृद्धी मोरे म्हणाली की, इयत्ता सातवीच्या पुस्तकात आम्ही ग्रहण हा विषय शिकलो होतो. शिक्षकांनी प्रयोगशाळेत ग्रहण कसे लागते त्यांचे मॉडेल दाखविले होते. पण आज प्रत्यक्ष ग्रहण कसे असते ते आम्हाला अनुभवता आले. Students seen Solar Eclipse in Guhagar

गुहागर न्यूजचे कौतुक

पालशेतमधुन आलेले प्राथमिक शिक्षक शिंदे गुरुजी यांनी यावेळी गुहागर न्यूजचे कौतुक केले. आयुकातर्फे गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर  ग्रहण पहाण्याचा उपक्रम होणार असल्याची माहिती गुहागर न्यूजमुळे मला मिळाली. गुहागर न्यूजवरील बातमी वाचुन मी इथे आलो आणि प्रत्यक्ष ग्रहण कसे लागते याचा अनुभव घेतला.  शिंदें गुरुजींप्रमाणेच अनेक पालक गुहागर न्यूजवरील बातमी वाचून ग्रहण पहाण्यासाठी आले होते. त्यांनी देखील ही खगोलीय घटना गुहागर न्यूजमुळेच आम्हाला पहात आली. असे आवर्जुन सांगत गुहागर न्यूज आणि आयुकाचे आभार मानले. Students seen Solar Eclipse in Guhagar

#SolarGoggles #SolarEclipse #सूर्यग्रहण #IUCAA #आयुका #guhagar @IUCAA SciPOP @shivani pethe @IUCAA Library #guhagarbeach

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiguhagarbeachIUCAALatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLibraryMarathi NewsNews in GuhagarSciPOPshivani petheSolarEclipseSolarGogglesStudents seen Solar Eclipse in GuhagarUpdates of Guhagarआयुकागुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजसूर्यग्रहण
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.