रत्नागिरी, ता. 22 : नासा व इस्रो येथे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना नेण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यासाठी एकूण 27 जणांची निवड करण्यात आली आहे. Students from Ratnagiri district will go to NASA, ISRO
वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी अमेरिकेतील नासा व भारतातील इस्रो या संस्थेला गुणवंत विद्यार्थ्यांची भेट घडवण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील परीक्षेसाठी 90 विद्यार्थी पात्र ठरले होते. या सर्वांच्या मुलाखती मंगळवारी पार पडल्या. यासाठी विज्ञानातील तज्ज्ञ 15 अध्यापकांची नियुक्ती जिल्हा परिषदेने केली होती. Students from Ratnagiri district will go to NASA, ISRO
नासा, इस्त्रो जाणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे
मंडणगड – प्रभुती घागरूम (कोन्हवली), श्लोक सुगदरे, जान्हवी खापरे (शेडवई), दापोली- धनश्री जाधव (शिरसोली), तनिष्का बोधगावकर (जालगाव), सुयश गोसावी (मळे), खेड- कीर्ती मुंडे (असगणी), सार्थक महाडिक (धामणदिव – बेलवाडी), वेदांत मोरे (देवघर-निवाचीवाडी), चिपळूण- दक्ष गिजये (पाग), अभय भुवड (तुरंबव), इच्छा कदम (अनारी), गुहागर – सोनाली डिंगणकर (काजुर्ली), क्षितिजा मोरे (वेळंब), मुशतहा शेख (कोंडशृंगारी), संगमेश्वर – निरज इनामदार (तुरळ), आरोही सावंत (ओझरखोल), नितीन बोडेकर (चाफवली), रत्नागिरी – वेदांत सनये (कुवारबांव), प्रेरणा भोजने (गोळप ), साथिया संते (गोळप), लांजा- आशिष गोबरे (शिरवली), आर्यन गुरव (वनगुळे), वेदिता वारंगे (लांजा), राजापूर – विनया जाधव (भालावली), भुषण धावडे (पांगरे बु.), प्राजक्ता भोकरे (तुळसवडे) यांची निवड झाली. Students from Ratnagiri district will go to NASA, ISRO
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, अतिरिक्त सीईओ परिक्षित यादव, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी एस. जे. मुरकुटे, संदेश कडव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी विद्यार्थी निवडीचे नियोजन केले. तालुकास्तरावर झालेल्या परीक्षेतून जिल्हास्तरासाठी 90 विद्यार्थी निवडण्यात आले होते. यातून 27 जणांची निवड करण्यात आली. तालुक्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला इस्रो तसेच नासाला भेट देता येणार आहे. Students from Ratnagiri district will go to NASA, ISRO