संदेश कदम, आबलोली
गुहागर ता. 07 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. नुकताच दहावीचा निकाल लागला असून असोरे गावातील कु. सलोनी मंजिरी मनोहर सुर्वे आणि कु. प्रियंक समिता सुभाष सुर्वे यांनी दहावीत घवघवीत यश संपादन केलं आहे. Students from Asore achieved success in SSC exam

असोरे गावातील कु. प्रियंक सुभाष सुर्वे हा सेंट झेवियर्स हायस्कूल, शांतिपार्क, मीरा रॊड ( पूर्व ) ठाणे येथील शाळेचा विद्यार्थी असून त्याला ७९.६० % गुण प्राप्त झाले आहेत. त्याच प्रमाणे कु. सलोनी मनोहर सुर्वे ही ग. ज. तथा तात्या वझे विद्यामंदिर पाचेरी आगर, ता.गुहागर जि.रत्नागिरी या शाळेची विद्यार्थिनी असून तिला ७१.८०% गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे सलोनी हिने ग. ज. तथा तात्या वझे विद्यामंदिर या शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. Students from Asore achieved success in SSC exam

असोरे गावातील दहावीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे. अनेक वर्षापासून गावातील शैक्षणिक प्रगती सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. गावात राहून अनेक आधुनिक सुविधांचा अभाव असून देखील मोठं यश संपादन करणे ही गोष्ट कौतुकास्पद वाटत असल्याचे सांगत गावातील थोर – मोठ्या मंडळींनी आपले मत यावेळी व्यक्त केले आहे. तसेच मुबंईत राहणाऱ्या यशस्वी मुलांचेही अभिनंदन करण्यात आले. असोरे गाव आणि मुंबईत राहणाऱ्या मुलांनी अशीच प्रगती करून गावाचे आणि घराण्याचे नाव उज्जवल करावे तसेच भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी बौध्दजन सेवा संघ(रजि)असोरे, सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ असोरे आणि सिद्धार्थ कला वैभव मंडळ यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. Students from Asore achieved success in SSC exam
