गुहागर हायस्कूल मधील दहावीच्या 23 विद्यार्थ्यांचा सत्कार
गुहागर, ता. 22 : गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP ) वतीने आज गुहागर हायस्कूल मधील दहावीच्या परिक्षेत 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 23 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य व भेट वस्तूही देण्यात आल्या. Students felicitated on behalf of NCP
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा. आपल्यातील गुणवत्तेचा चांगला उपयोग करून घ्यावा. शासनाच्या अनेक योजनांमधून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून अनेक विद्यार्थ्यांनी कमी वयात आपले करीअर घडवले आहे . असे या कार्यक्रमात बोलताना पद्माकर आरेकर म्हणाले. गुहागर हायस्कूलचा इ दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्या बद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी नगराध्यक्ष राजेश बेंडल, सुजाता बागकर, स्नेहा भागडे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. Students felicitated on behalf of NCP
या गुणगौरव सोहळ्यात सत्कार पात्र विद्यार्थ्यांमध्ये मुद्रा चौगुले, श्रूती पाटणे,गौरी विचारे , तन्वी बाणे, श्रूती गीझे, पार्थ गोयथळे, स्वरांगी गडदे, भुमी दाभोलकर, श्रीमुख महाजन, मैत्रेय आठवले, युवराज लोहकरे ,साक्षी बेंद्रे, अविना सुर्वे, आर्य खोत, मधुरा सोमण, रोहित फटकरे, प्रणाली घाडिगावकर, सेजल भेकरे, भाग्यश्री गुरव, संकल्प अवेरे, वृक्षभ मुकनाक, वैष्णवी साळवी यांचा भेटवस्तू देवून मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभाला विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. Students felicitated on behalf of NCP
या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पद्माकर आरेकर, नगराध्यक्ष राजेश बेंडल, महिला तालुकाध्यक्ष स्नेहा भागडे, शिक्षण सभापती सुजाता बागकर, शहर अध्यक्ष मंदार कचरेकर, प्रदिप बेंडल, स्वाती कचरेकर, श्रीधर बागकर, दिपक शिलधनकर,सौरभ भागडे, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, पर्यवेक्षक विलास कोरके, सौ मनिषा सावंत उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गोयथळे यांनी केले. व प्रास्ताविक मंदार कचरेकर तर आभार कृपाल परचूरे यांनी मानले. Students felicitated on behalf of NCP