रत्नागिरी, ता. 22 : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कविकुलगुरु कालिदास व्याख्यानमालिका कार्यक्रमात संस्कृतच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. Students felicitated in lecture series program
संस्कृतचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. मधुसूदन पेन्ना यांच्या हस्ते करण्यात आला. यात कै. भा. का. नेने स्मृती पारितोषिक आणि श्रीमती कमला गो. फडके स्मृती पारितोषिक सिद्धी ओगले, प्रीती टिकेकर, मयुरेश जायदे, ऐश्वर्या आचार्य यांना प्रदान करण्यात आले. सौ. ललिता शं. घाटे पारितोषिक मयुरेश जायदे, प्रा. पूर्णिमा आपटे स्मृती पारितोषिक मयुरेश जायदे, पं. दा. गो. जोशी स्मृती पारितोषिक प्रियांका ढोकरे व स्वरूप काणे यांना प्रदान केले. Students felicitated in lecture series program

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमालिका कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर डॉ. पेन्ना यांनी व्याख्यानात सांगितले की, गुलाबराव महाराजांच्या लिखाणाने मीसुद्धा प्रभावित झालो. त्यामुळेच त्यांच्या चरित्र व उपदेशांवर प्रज्ञाचाक्षूसम हे संस्कृत ८५० श्लोकांचे महाकाव्य रचले. त्याला भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कर जाहीर झाला. परंतु हा गौरव केवळ माझा नाही तर तो संत गुलाबराव महाराजांच्या तत्त्वज्ञानाचा आहे, त्यांनी नम्रपणे सांगितले. गुलाबराव महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडे (लोणी टाकळी) येथे झाला. गुलाबराव महाराज हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. त्यांना वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले होते. महाराजांच्या आयुष्यातील काही अनुभवांतून आपणही कार्य करत राहिले पाहिजे. Students felicitated in lecture series program
महाराज डोक्यावर पुस्तकांची पेटी घेऊन फिरत. वाचायला येतं त्याच्याकडून वाचून घेत आणि ऐकत. जेवढे ऐकत तेवढे त्यांचा पाठ व्हायचे. त्यांना दिव्यदृष्टी होती. बालपणीच त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला. आर्य हा वंश असून तो बाहेरून भारतात आला, हे मॅक्समुल्लरचे व लोकमान्य टिळकांचे मत गुलाबराव महाराजांना मान्य नव्हते, असेही डॉ. पेन्ना म्हणाले. त्यांचे मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर कमालीचे प्रभुत्व होते. त्यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयांवर लेखन केले. संस्कृत, हिंदी, मराठी या भाषांतून व वर्हाडी बोलीतून त्यांनी १३३ ग्रंथ लिहिले. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे वाङ्मयप्रकार त्यांनी हाताळले, असे डॉ. पेन्ना यांनी सांगितले. Students felicitated in lecture series program