रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरी तालुका अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघातर्फे सलग १३ व्या वर्षी विद्यार्थी गुणगौरव आणि कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. रविवारी सकाळी माळनाका येथील अ. के. देसाई हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम झाला. Students felicitated by Shiksha Sevak Sangh

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. ईर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांसह वर्षभरात निधन झालेल्या सर्वांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सत्कार करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ. के. देसाई हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद शेखर, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष गजानन पाटणकर, उपाध्यक्ष शंकर पालवकर, महिला प्रतिनिधी सौ. प्रियांका धर्णे, रत्नागिरी तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाचे अध्यक्ष रामचंद्र केळकर, सचिव संतोष शिंदे उपस्थित होते. मान्यवरांनी सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन नीलेश दामले यांनी केले व सहसचिव संतोष मळेकर यांनी आभार मानले. Students felicitated by Shiksha Sevak Sangh

सत्कारमूर्तींना प्रमाणपत्र, गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यामध्ये प्राप्ती अनुसे (वैज्ञानिक परीक्षा), सानिका गराटे (इस्रो परीक्षा), साईश्री मळेकर (बीडीएस इयत्ता नववी), दहावीतील गुणवंत सार्थक चव्हाण, शुभम अनुसे, सार्था शेट्ये, चंदना घडशी, आर्या कीर, समिक्षा देसाई, रिद्धी वाडेकर, प्रियांका साखरपेकर यांना गौरवण्यात आले. बारावीतील तनिष साळवी, झोहा मुजावर, शर्वरी सावंत, ओंकार गाजुलवार, मैत्रेयी मोहिते, चिन्मय सुर्वे (बीई इलेक्ट्रिकल), ईश्वर गाजुलवार (बीए फाइन आर्टस्), चिन्मय गर्दे (बी. कॉम.) यांचा सत्कार केला. केळ्ये येथील गोडबोले विद्यालयातील सेवक महेश सनगरे हे कुसुमताई पतसंस्थेत संचालक निवडून आल्याबद्दल गौरव केला. तसेच गेल्या वर्षभरात सेवानिवृत्त झालेले संघटनेचे सदस्य सुनिल पवार (टेंभ्ये हायस्कूल), सौ. सुनंदा मेश्राम (पाली हायस्कूल), खालीदशेख मजगावकर (ए. डी. नाईक हायस्कूल), महादेव पटेकर (ए. डी. नाईक हायस्कूल), दीपक रसाळ (मिस्त्री हायस्कूल) यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. Students felicitated by Shiksha Sevak Sangh
