गुहागर, ता. 08 : गुहागर पंचायत समितीच्या वतीने इ.१० वी व इ.१२ वी मधील गुहागर तालुक्यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पंचायत समिती सभागृह, गुहागर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी, गटविकास अधिकारी सिकंदर इनामदार, गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे व पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते. Students felicitated by Guhagar Panchayat Samiti

या सत्कार कार्यक्रमांमध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व क. महाविद्यालय गुहागरच्या इयत्ता बारावी शास्त्र शाखेमध्ये प्रथम क्रमांक आदर्श महेश सोलकर ७६.६६ टक्के, द्वितीय क्रमांक सलोनी संजय मुकनाक ६८.१६ टक्के, तृतीय क्रमांक हेमाक्षी सुधीर भागडे ६३.६६ टक्के, इ.१२ वी वाणिज्य शाखेमध्ये अंजनवेल विद्यालयामधील संस्कृती राहुल बाईत ८५.६७ टक्के प्रथम क्रमांक, गुहागर कनिष्ठ महाविद्यालयाचा ओम संतोष पारदळे, वाणिज्य शाखा ८२.८३ टक्के द्वितीय क्रमांक, श्रृंगारी उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय श्रृंगारतळीचे तहरीम मकबूल पाटकरी वाणिज्य शाखा ७९.८३ टक्के तृतीय, इ.१२ वी कला शाखा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पाटपन्हाळे रिया विश्वास कुंभार कला शाखा ७७.३३ टक्के प्रथम क्रमांक, चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोलीची सेजल सदानंद कुळे कला शाखा ७५.६६ टक्के द्वितीय, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पाटपन्हाळे संजना संतोष चव्हाण कला शाखा ७४.६६ टक्के तृतीय क्रमांक, इयत्ता १० वी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पाटपन्हाळेची समृद्धी सुरेश आंबेकर इयत्ता १० वी ९९.२० टक्के प्रथम क्रमांक, पालशेत हायस्कूलचे आर्या विलास ओक इयत्ता १० वी ९७.२० द्वितीय क्रमांक, श्रृंगारी उर्दू विदयालय श्रृंगारतळीचे मुस्तफा मुनव्वर शेख इयत्ता १० ९७,२० टक्के द्वितीय क्रमांक, गुहागर हायस्कूलची रेईशा विरेंद्र चौघुले इयत्ता १० वी ९६.८० टक्के तृतीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे यांनी केले. Students felicitated by Guhagar Panchayat Samiti
