गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने रविवार दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता भंडारी भवन कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. Students felicitated by Bhandari society

२०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी ७० टक्के, इयत्ता बारावी ६० टक्के, शिष्यवृत्ती धारक, पदवीधर व मान्यता प्राप्त राज्य व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव आयोजित करण्यात आला आहे. तरी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी गुणपत्रक झेरॉक्स दिनांक २७ जुलै २०२४ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात सकाळी १० ते १ वाजेपर्यंत जमा करावेत, असे आवाहन गुहागर तालुका भंडारी समाज प्रभारी अध्यक्ष नवनीत ठाकूर यांनी केले आहे. Students felicitated by Bhandari society
