विद्यार्थ्यांनी यशाची व्याप्ती वाढवावी – निलेश गोयथळे
गुहागर, ता. 15 : विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश मर्यादित न ठेवता त्या यशाची व्याप्ती वाढवावी, असे प्रतिपादन श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे क्रीडा शिक्षक व जुदो जिल्हाध्यक्ष निलेश गोयथळे यांनी केले. श्री. गोयथळे हे गुहागर खालचापाट येथील गोयथळे- पाटील- भोसले या मंडळींच्यावतीने इयत्ता दहावी, बारावी, पदविका परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या मंडळातील विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. Students felicitated at Guhagar
यावेळी इयत्ता दहावीतील पार्थ राजेंद्र गोयथळे, पारस नयन गोयथळे, तनवी उमेश पाटील, तसेच इयत्ता बारावी मधील महीका महेश पडवळ, अथर्व विद्याधर गोयथळे, दीक्षा मंगेश पाटील, अवंतिका प्रदीप भोसले, जान्हवी नंदकुमार गोयथळे, गौरवी नंदकुमार गोयथळे व पदवी परीक्षा उत्तीर्ण दिव्या नयन गोयथळे तर गुणवत्ता शोध परीक्षा यशस्वी ठरलेल्या शंतनु नवरंग पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. Students felicitated at Guhagar
या सत्कार कार्यक्रमाला खोत नितीन गोयथळे, उमेश गोयथळे, महेंद्र पाटील, विद्याधर गोयथळे, नगरसेवक अमोल गोयथळे, राजेश गोयथळे, जितेंद्र गोयथळे, प्रशांत गोयथळे, अजिंक्य पाटील, सौरभ गोयथळे, राकेश गोयथळे, तनय गोयथळे, योगेश गोयथळे, संकेत गोयथळे, मंदार गोयथळे, तेजस गोयथळे, शिक्षक नवरंग पाटील, पराग भोसले, सतीश पाटील, नयन गोयथळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत गोयथळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मंदार गोयथळे यांनी मानले. Students felicitated at Guhagar