श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाची अनिवासी गुरुकुल प्रकल्पअंतर्गत क्षेत्रभेट
गुहागर, ता.19 : तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाची अनिवासी गुरुकुल प्रकल्प अंतर्गत क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत खातू मसाले इंडस्ट्री व शांताई रिसॉर्ट हॉटेल यांना भेट देण्यात आली. यावेळी खातू मसाले उद्योगाबद्दल शालिग्राम खातू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे देत खातू मसाला उद्योगाची प्रगती कशी झाली याबद्दल माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांना भेटवस्तूही दिल्या. Students enjoyed field visit
हॉटेल शांताईमध्ये हॉटेलचे मॅनेजर ओक व स्टाफ यांनी विद्यार्थ्यांना हॉटेलच्या कामकाजाबद्दल संपूर्ण माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट व व्यवसाय याबद्दल ज्ञान प्राप्त झाले त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीचा आनंद लुटला. या क्षेत्रभेटीने आम्हाला इंडस्ट्रीज कशी चालते? कच्चा माल व तयार होणारा पक्का, माल व त्याची विक्री यांची सखोल ज्ञान मिळाले, असे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. शांताई हॉटेल परिसराची स्वच्छता, प्लास्टिक मुक्त परिसर व दिलेली सेवा सुविधा मनाला भावल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. Students enjoyed field visit
शाळेने ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गुरुकुल प्रमुख ढेंबरे, शिंदे, सावर्डे, हिवराळे व कणसे मॅडम यांचे आभार मानले. विद्यालयाचे मुख्याध्यापक जोगळेकर यांनी या उपक्रमास प्रेरणा दिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे खास आभार मानले व असेच चांगल्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आम्हाला आवडेल, अशी इच्छा प्रकट केली. श्री ढेंबरे सरांनी विद्यार्थ्यांना शिस्तीने वागल्याबद्दल धन्यवाद दिले व सर्वांचे आभार मानले. Students enjoyed field visit