श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर विद्यार्थ्यांचा उपक्रम
गुहागर, ता. 26 : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर यांनी स्वीप द्वारा अनेक उपक्रम या आठवड्यात राबवण्यात आले. यामध्ये उच्च माध्यमिक विभाग यांनी संकल्पपत्राद्वारा समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या पालकांना पत्राद्वारे मतदानाचे महत्त्व, त्याची आवश्यकता, त्याचे फायदे हे सर्व पत्राद्वारे पटवून दिले आहे. त्याचबरोबर मतदानाविषयी असलेली साशंकता मिटवण्याचा प्रयत्न पत्राद्वारा केला आहे. Students created awareness about voting
या पत्रातून सर्व नागरिकांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 ला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करणे, 100% मतदान करण्यासाठी उदबोधित केले आहे. यामुळे शंभर टक्के मतदान होण्यास मदत होईल आणि समाजामध्ये, नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण होईल. असा प्रयत्न संकल्प पत्रातून केला आहे. संकल्प पत्र लिहून घेण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ बावधनकर मॅडम, सौ पालशेतकर मॅडम, सौ. सागवेकर मॅडम, प्रा. कोमल गुरव मॅडम यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. Students created awareness about voting
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कांबळे सर व उपप्राचार्य श्री. कोरके सर पर्यवेक्षिका कांबळे मॅडम, पर्यवेक्षक गंगावणे सर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गुहागरचे तहसीलदार श्री. परीक्षित पाटील उपस्थित होते. त्यांनी यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अशा पद्धतीने अतिशय उस्फुर्तपणे हा उपक्रम कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झाला. Students created awareness about voting