हर घर तिरंगा अभियान
गुहागर, ता. 23 : केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत कोतळूक येथे विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यावर आधारीत घोषणा व लेझीम नृत्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. Students Awareness round at Kotaluk


गुहागर तालुक्यातील कोतळूक येथील ना.गोपाळकृष्ण गोखले विदयालय, जिल्हा परिषद केंद्रीय शाळा कोतळूक नंबर १ मधील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढा तो महान माझा तिरंगा माझी शान, मुक्त जाहला देश माझा तिरंगा माझ्या मनाचा राजा, माझे घर माझी शान माझा तिरंगा माझा अभिमान, ध्वज संहितेचे पालन करू तिरंगा आपण घरोघरी फडकवू अशा स्वातंत्र्यावर आधारीत घोषणा, लेझीम नृत्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. गावातील नागरीकांनी स्वयंप्रेरणेने हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करण्यात आले. Students Awareness round at Kotaluk


या जनजागृती फेरी वेळी शिक्षण विभाग विस्तार अधिकारी श्री देसाई, ना.गोपाळकृष्ण गोखले विदयालय कोतळूकचे मुख्याध्यापक बनसोडे सर, बाळासाहेब आडके, मंदार गोरिवले, श्रीमती वीर, श्री वाय. आर.आग्रे, मुकुंद पानवलकर, भिकाजी मोहिते ,शाळा नंबर १ मुख्याध्यापक कृष्णा पागडे, प्रताप देसले, महेश सुर्वे, श्रीमती जगताप, श्रीमती पाटील आदी शिक्षकांसह विद्यार्थी सहभागी झाले होते. कोतळूक येथील विद्यार्थ्यांच्या जनजागृती मोहीमेचा खालील व्हिडीओ नक्की पहा. Students Awareness round at Kotaluk
हर घर तिरंगा या अभियानाच्या माहितीसाठी क्लिक करा