गुहागर, ता. 15 : आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (NMMS) पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली. राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. त्यामध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स.सु.पाटील शास्त्र, श्री. म.ज. भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या शाळेतील चार विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. Student selection for NMMS
शिष्यवृत्तीसाठी गुहागर हायस्कूल मधील रेईशा वीरेंद्र चौगुले, आर्या मंदार गोयथळे, ऋषभ नरेश दाभोळकर, श्रवण श्रीकांत चव्हाण या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या शाळेमधून १८ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. यापैकी चार विद्यार्थ्यांना शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. Student selection for NMMS
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ, पालक शिक्षक संघ, शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, उपमुख्याध्यापक विलास कोरके, पर्यवेक्षिका सुजाता कांबळे, पर्यवेक्षक मधुकर गंगावणे, राधा शिंदे, कृपाल परचुरे, वैभव ढोणे, प्रदीप जाधव, जयश्री बाणे, स्वामिनी भोसले, मिताली पाकळे, सुचिता ठाकूर, मीना चव्हाण, गायत्री कनगुटकर, मनीषा सावंत, गीतांजली करंजवकर, विनायक जाधव, गुलाबसिंह पाडवी, सोनाली हळदणकर, निलेश गोयथळे यांनी प्रशालेतील सर्व मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. Student selection for NMMS