रत्नागिरी, ता. 16 : मुंबई घाटकोपर येथे होर्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रत्नागिरी प्रशासन अलर्ट मोड वर आले आहे. आता तातडीने रत्नागिरी शहरातील १९२ होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तत्काळ सादर करण्याची नोटीस नगरपालिकेने होर्डींग मालकांना बजावली आहे. Structural audit of hoardings in Ratnagiri
मुंबईत घाटकोपर येथे सोमवारी वादळी पावसात भलेमोठे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेत शंभर जण या होर्डिंगखाली गाडले गेले. यात अनेक जणांना मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर रत्नागिरी नगरपालिका प्रशासन जागे झाले आहे. मंगळवारी पालिकेने शहरातील होर्डिंग बाबत आढावा घेतला. शहरात सद्यस्थितीत १९२ अधिकृत होर्डींग असल्याची नोंद पालिकेकडे आहे. याशिवाय अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डींग देखील उभारण्यात आले आहेत. Structural audit of hoardings in Ratnagiri
मंगळवारी तातडीने पालिकेने सर्व होर्डिंग मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. आपल्या होर्डींग सद्यस्थितीत कशा आहेत याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तत्काळ याबाबत पालिका प्रशासनाला अहवाल सादर करा, अन्यथा प्रशासनाकडून कडक कारवाई होईल, असे या नोटीसीत म्हटले आहे. ऑडिट करण्यासाठी पालिकेने संबंधित मालकांना मुदत दिली असून या मुदतीत स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. Structural audit of hoardings in Ratnagiri