• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंजनवेल येथे महिला सक्षमीकरणावर पथनाट्य

by Ganesh Dhanawade
January 15, 2023
in Guhagar
259 3
0
Street play performed at Anjanvel
509
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

KDB महाविद्यालयातील आजीवन आध्यापन व महिला विकास कक्षाचे आयोजन

गुहागर, ता. 15 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील (Khare-Dhere-Bhosle College) आजीवन आध्यापन व विस्तार विभाग (Department of Life Long Learning) आणि महिला विकास कक्ष (Women Development Cell) यांच्या संयुक्त विद्यमाने ” महिलांचे सक्षमीकरण आणि अस्तित्व” हे पथनाट्य करण्यात आले. अंजनवेल येथील दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय व भागीर्थीबाई सुदाम पाटील जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स (संयुक्त ) कॉलेजच्या पटांगणावर सादर करण्यात आले. Street play performed at Anjanvel

या पथनाट्यातून सध्या समाजात होत असलेल्या स्त्रियांवरील अत्याचार, त्यांचे अस्तित्व, त्यांना पावलो पावली सहन करावी लागणारी अवहेलना, कुटुंबातून व समाजातून मिळणारी दुय्यम वागणूक, बालविवाह, बालहत्या, ॲसिड अटॅक, प्रसारमाध्यमांची अविश्वासहार्यता इत्यादी ज्वलंत विषयांवर या पथनाट्याद्वारे सामाजिक संदेश देण्यात आला. आजच्या काळात या सर्व प्रकारच्या समस्यांना स्त्रियांना कौटुंबिक तसेच कामाच्या ठिकाणी सामोरे जावे लागते. Street play performed at Anjanvel

Street play performed at Anjanvel
महिलांचे सक्षमीकरण आणि अस्तित्व” हे पथनाट्य करताना

या पथनाट्याद्वारे असे सांगण्यात आले की, जर स्त्रियांना दुय्यम लेखले गेले तर भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. याचे प्रत्यक्ष सादरीकरण महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी केले. श्रोत्यांना आपल्या सादरीकरण्यातून मंत्रमुग्ध केले. या पथनाट्य सादरीकरणासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. विराज महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये मृणाल पाटील, सेजल देवकर, मिहिर बारटक्के, संजना निवाते, सौरभ विचारे, मयुरी पाटील, मयुरी माने, श्रद्धा पारधी, आदित्य कदम, द्वीप कचरेकर, सहिल पावसकर, सार्थक निमुणकर, सूरज कुळे व ऋतिकेश झगडे या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. Street play performed at Anjanvel

हे पथनाट्य सादरीकरण करत असताना अंजनवेल कॉलेजचे प्राचार्य श्री. मंगेश गोरीवले, प्रा. श्री. यु. बी. जाधव, प्रा. एस. एस. बंदीछोडे व इतर सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच डेल विभागाचे समन्वयक प्रा. पी एम. आगळे, प्रा. डॉ. आर. एस. सोळंके उपस्थित होते. Street play performed at Anjanvel

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarStreet play performed at AnjanvelUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share204SendTweet127
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.