खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे आयोजन
गुहागर, ता. 31 : फुले, सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का ? असा प्रश्न विचारुन सध्याच्या स्त्रियांच्या सर्व समस्यांवर ‘ स्त्री-सक्षमीकरण ’ हाच उपाय असल्याचा संदेश पथनाट्य सादरीकरणातून खरे -ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या (Khare-Dhere-Bhosle College) राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी दिला. Street play on women empowerment


या पथनाट्यातून सध्या समाजात होत असलेल्या स्त्रीभृण हत्या, बालविवाह, मुलींची छेडछाड व लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसाचार, दुय्यम वागणूक, आजही त्यांच्या शिक्षणाला होणारा विरोध या प्रसंगावर सादरीकरण करून त्यावर सर्वांगीण सक्षमीकरण हाच उपाय असल्याचा संदेश दिला. सर्वप्रथम तहसिलदार कार्यालय परिसरात पथनाट्य सादरीकरण होत असताना तहसिलदार प्रतिभा वराळे, नगरपंचायत प्रशासक श्री. पेढांबकर, पोलीस निरीक्षक श्री. सचीन सावंत, उपनिरीक्षक पवन कांबळे आदी उपस्थित होते. या समाजप्रबोधनपर पथनाट्याच्या सादरीकराणाबाद्द्ल तहसिलदार वराळे यांनी स्वयंसेवकांचे पुष्प देऊन अभिनंदन केले. Street play on women empowerment




श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यासमोर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे यांनीही आज समाजात अशाप्रकारच्या प्रबोधन पथनाट्याची गरज असल्याचे सांगून कौतुक केले. त्यानंतर गुहागर बसस्थानक येथील प्रवाशांसमोर पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी गुहागर प्रभारी बसस्थानक प्रमुख श्री. शिंदे व त्यांचे सहकारी यांनी स्वयंसेवक करत असलेल्या समाजप्रबोधनपर पथनाट्याचे कौतुक केले. परिवहन विभागाचे श्री. सावंत यांनी समाजाने आपली मानसिकता बदलली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. प्रदीप आठवले यांनी पथनाट्यावर मत प्रदर्शित करताना, आजच्या स्त्रीने स्वत: खंबीर व निर्भय होण्याचे आवाहन केले. Street play on women empowerment


सदर संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. आनंद कांबळे, प्रा. निळकंठ भालेराव, डॉ. आर. जी. गोडसे, डॉ आर. एस. सोळंके व सौ. रश्मी आडेकर यांनी केले. या पथनाट्यात अथर्व वराडकर, प्राजेश धावडे, सोहम खरे, नेहा किल्लेकर, सूरज पवार, सूरज कळंबाटे, प्राची धनावडे, सानिका मोरे, दिक्षा रांजाणे, संजना निवाते, स्वराज्य मयेकर व शुभम कुरधुन्डकर इ. विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व सहभागी स्वयंसेवकांचे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य श्री. पद्मनाभ सरपोतदार यांनी अभिनंदन केले. Street play on women empowerment

