एकही ग्रामसभा घेतली नाही, प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही
गुहागर, ता. 09 : मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीची सन २०२३-२०२४ या वर्षामध्ये किमान चार ग्रामसभा होणे गरजेचे असताना अद्याप एकही ग्रामसभा होऊ शकली नाही. ग्रामसभा घेण्यात यावी यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊनही वरिष्ठ प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने नाराज झालेल्या ग्रामस्थांनी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. Strange governance of Gram Panchayat Margtamhane
या निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२३ व जानेवारी २०२४ च्या ग्रामसभेची प्रथम नोटीस काढली गेली. परंतु, यावेळी सभा तहकूब झाल्यामुळे द्वितीय नोटीस काढण्यात आली. यावेळी सरपंच यांनी रजेवर असल्याबाबत सूचित केले. तसा अर्ज पंचायत समितीला दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर उपसरपंच यांच्याकडे सहीला गेले असता त्यांनी या नोटीसवर सही करणार नाही, मी ही रजेवर जाणार आहे, असे सांगितल्याने या दोन्ही सभा होऊ शकल्या नाहीत. यानंतर सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षामध्ये मे 2024 च्या ग्रामसभेची प्रथम नोटीस काढली गेली. पून्हा द्वितीय नोटीस काढली असता त्यावरही सही न झाल्याने सभा होऊ शकली नाही. सरपंच व उपसरपंच यांच्या बेजबाबदार वागणुकीवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. ग्रामसभा न झाल्याने मार्गताम्हाणे खुर्द गावातील विकास कामे चौदावा व पंधरावा वित्त आयोगातील कामे पूर्ण न झाल्याने निधी परत जात आहे. याबाबत योग्य कारवाई व्हावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी मागणी केली आहे. Strange governance of Gram Panchayat Margtamhane
या संदर्भात सरपंच शितल चव्हाण यांना फोनवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.