सर्व पर्यटन स्थळे हाऊसफुल्ल
गुहागर, ता. 01 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू असलेल्या गुहागरात जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे, हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरलेली आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रविवारी सकाळपासूनच चौपाटीवर पर्यटकांनी गर्दी केली होती. Stormy rush of tourists in Guhagar
तालुक्यात पर्यटन हंगामात दिवसाला सुमारे १२०० ते १६०० पर्यटक येत असतात. यामध्ये सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या जास्त असते. दरवर्षी पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे गुहागरातील पर्यटनाला गेल्या काही वर्षात सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, गेली दोन वर्षांपूर्वी गुहागरच नव्हे तर राज्यातील सर्वच पर्यटन व्यवसायावर कोरोनाचे संकट कोसळले होते. लॉकडाऊनमुळे तालुक्यातील हॉटेल, लॉज व घरगुती राहण्याच्या ठिकाणांना कोरोना महामारीचा मोठा फटका बसला होता. मात्र, कोरोनाच्या संकटानंतर पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर आले आहे. Stormy rush of tourists in Guhagar
निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी लाभलेल्या गुहागरची ओळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरासह प्रेक्षणिय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठया संख्येने येत असतो. वर्षातून नाताळ सुट्टी व ३१ डिसेंबरला गुहागर पर्यटकांनी फुल्ल होऊन जातो. तर एप्रिल महिन्यात मुलांच्या परिक्षा झाल्यानंतर शाळ महाविद्यालयाच्या सुट्ट्यामुळे व कडाक्याच्या उन्हामुळे मुंबई, पुणे व अन्य ठिकाणचे पर्यटक कोकणात धाव घेतात. Stormy rush of tourists in Guhagar
तालुक्यात सुमारे ७० हॉटेल, ४० एमटीडीसी निवासस्थाने व ८० घरगुती निवास आणि राहण्याची व्यवस्था आहे. गेल्या काहीवर्षात असगोली किनारी द वूडस्, मोडका आगर येथे शांताई रिसॉर्ट, गुहागर कीर्तनवाडी येथे मँगो व्हीलेज, पालशेत किनारी गाज अशी चांगल्या दर्जाची राहण्याची ठिकाणे निर्माण झाली आहेत. Stormy rush of tourists in Guhagar
यामुळे पूर्वी गृहागरला धावती भेट देऊन जाणारा पर्यटक आता सलग तीन ते चार दिवस वास्तव्य करु लागला आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गुहागर चौपाटीवर समुद्रातील बोटीग, घोडेस्वार, उंट सफरी, पॅराग्लायडिंग सफर, खाद्य पदार्थांचे स्टॉलवर गर्दी केली होती. लहान मुलांनी वाळूमध्ये किल्ले, वेगवेगळी शिल्पे बनवली होती. गुहागर, वेळणेश्वर, चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरलेली होती. किनाऱ्यावर काही ठिकाणी डिजे साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली होती. थंडीमुळे किनाऱ्यावर ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत हॉटेल व घरगुती खानावळी मध्ये जेवणासाठी गर्दी दिसून येत होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये व रात्रीच्या वेळी समुद्राच्या पाण्यात जाणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली होती. संपूर्ण पोलीस ग्राउंड वाहनांनी भरून गेले होते. Stormy rush of tourists in Guhagar