गहू आणि तांदळाची विक्री थांबवली
गुहागर, ता. 18 : केंद्र सरकारने रेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नवीन अपडेटनुसार, केंद्र सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना तांदूळ आणि गव्हाची विक्री थांबवली आहे. त्यामुळे गरीबांना मोफत अन्नधान्य पुरवणाऱ्या कर्नाटकसह काही राज्यांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे. Stopped sale of wheat and rice to ration card holders


Economic Times ने दिलेल्या वृत्तानुसार OMSS अंतर्गत, ईशान्येकडील राज्ये, डोंगराळ राज्ये आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या राज्यांसाठी प्रति क्विंटल 3,400 रुपये विक्री सुरू राहील. बाजारातील किंमती कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार FCI OMSS अंतर्गत खाजगी व्यापाऱ्यांना केंद्र सरकारकडून तांदूळ दिला जाऊ शकतो. 12 जून रोजी, केंद्राने 31 मार्च 2024 पर्यंत गव्हावर स्टॉक मर्यादा लागू करताना खुल्या बाजारातील किंमत कमी करण्यासाठी OMSS अंतर्गत तांदूळ-गहू देण्याची घोषणा केली होती. Stopped sale of wheat and rice to ration card holders


सरकारने OMSS अंतर्गत 15 लाख टन गहू केंद्र सरकारकडून खाजगी व्यापारी आणि गहू उत्पादनांच्या उत्पादकांना ई-लिलावाद्वारे विकण्याची घोषणा केली होती. या व्यापाऱ्यांना OMSS अंतर्गत विक्रीसाठी असलेल्या तांदळाचे प्रमाण निश्चित करण्यात आले नव्हते. केंद्र सरकारने 26 जानेवारी 2023 रोजी OMSS धोरण आणले होते. या अंतर्गत राज्यांना त्यांच्या योजनांसाठी ई-लिलावात भाग न घेता FCI कडून तांदूळ आणि गहू दोन्ही खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. Stopped sale of wheat and rice to ration card holders