आ. जाधवांनी विधानसभेत उठविला आवाज
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील वरवेली येथे पर्यावरणास हानिकारक ठरणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दगड उत्खननाबाबत आ. भास्कर जाधव यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून हे उत्खनन बंद करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. Stone quarrying in Varveli should be stopped
या दगड उत्खननामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या बागायती, नागरिकांचे घरे, मंदिरे, गोठे, शाळा यांना तडे जाऊन फार नुकसान झाले आहे. अद्यापही एकाही व्यक्तीला नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. प्रशासनाची दिशाभूल करून याच खाणीच्या शेजारी दुसरी खाण सुरू करण्यात आली आहे. सुरु असलेले उत्खनन बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी आ. भास्कर जाधव यांना केली होती. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विषय उपस्थित केला होता. Stone quarrying in Varveli should be stopped

यावेळी आ. जाधव यांनी सांगितले की, वरवेली येथील बेसुमार दगड उत्खननामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. नियमांचे उल्लंघन करून रात्रदिवस काळा दगड उत्खननामुळे परिसरात प्रचंड धुळ उडुन बागायतीना धोका पोचत होता. खाणीतील अनियंत्रित स्फोटामुळे गावातील घरे, मंदीरे, शाळा, गोठे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या संदर्भात मागील अधिवेशनात सदरचे काळा दगड उत्खनन बंद करण्याबाबत लक्षवेधी मांडली होती, असेही जाधवांनी सभागृहात सांगितले. त्यावेळी आ. भास्कर जाधव व आ. आशिष शेलार यांनी सदरचे काळा दगड उत्खनन तातडीने बंद करावेत, अशी सभागृहात मागणी केली होती. Stone quarrying in Varveli should be stopped

प्रश्नोत्तराच्या वेळेत महसूलमंत्र्यानी सदरचे उत्खनन ताबडतोब बंद करण्यात यावेत असे आदेश अधिकाऱ्याना दिले. त्यानंतर काही काळ दगड उत्खनन बंद ठेवून तेथूनच १०० मीटरवर पुन्हा दगड उत्खनन सुरु केले. अधिकाऱ्यानी महसूल मंत्र्यांना रिपोर्ट दिला की, आम्ही सदर दगड उत्खनन करणारी खाणी बंद केली आहे. परंतु याच परवानगीच्या नावाखाली दुसरी काळा दगड खाण (क्वॉरी) सुरू केली आहे. या परिसरामध्ये अनेक घरांची पडझड होत आहे. बागायतदार व शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान होत आहे. शासनाने याकामी तात्काळ लक्ष घालून याची वस्तुनिष्ठ पाहणी करून ही खाण बंद करण्यात करावी, अशी मागणी केली. Stone quarrying in Varveli should be stopped
आ. जाधव यांनी वरवेली गावाला काळा दगड उत्खननामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल पावसाळी अधिवेशनात आवाज उठविल्याने वरवेली गावातील ग्रामस्थांनी आ. जाधव यांचे आभार मानले आहेत. Stone quarrying in Varveli should be stopped
