गुहागर तालुका उबाटा पक्षातर्फे पोलिसांना निवेदन
गुहागर, ता. 11 : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. विकास उर्फ अण्णा जाधव यांनी भास्करराव जाधव यांच्यावर केलेले आरोप खोटे व त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करणारे होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार असलेल्या आ. जाधव यांचे नाव घेऊन बदनाम करुन त्यांच्या होणाऱ्या मतदानावर कसा जाणीवपुर्वक परिणाम करता येईल असे कृत्य घडविले गेले आहे. त्यांचा हा खोटारडेपणा जनतेसमोर जाहिरपणे उघड व्हावा, असे निवेदन गुहागर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवारी गुहागर पोलीस स्थानकात देण्यात आले आहे. Statement to the police by Ubata Party
या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका दरम्यान गुहागर तालुक्यामध्ये दि. १७ नोव्हेबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर तालुक्यातील नरवण येथे प्राणघातक हल्ल्याची घटना घडली. सदरील घडलेली घटना हि विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात घडुन आमच्या पक्षाचे नेते व महाविकास आघाडीचे व गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. भास्करराव जाधव यांनीच घडविल्याचे बिनबुडाचे आरोप फिर्यादी श्री. विकास उर्फ अण्णा जाधव यांनी जाहिरपणे सोशल मीडिया, इलेक्ट्रानिक मीडिया व सर्व प्रसार माध्यमांद्वारे संपूर्ण मतदारसंघ, जिल्हयासह व महाराष्ट्रभर पसरविले. यातून आमचे पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. जाधव साहेब यांची जाणीवपूर्वक वारंवार नामोल्लेख करुन बदनामी केली. Statement to the police by Ubata Party
उमेदवार असलेल्या श्री. भास्करराव जाधव यांच्या मतदानावर परिणाम होणारे कृत्य केले व त्यातुन आम्हाला खुप त्रास झाला. आपण या घटनेची तात्काळ दखल घेवून जनतेसमोर वेळीच सत्य काय ते आणणे आवश्यक होते. परंतु उशीरा का होईना आपण यातील आरोपींना नुकतेच पकडल्याचे वर्तमानपत्रातुन वाचनात आले. आम्हा पदाधिकाऱ्यांची विनंती वजा सुचना आहे कि, या प्रकरणांमध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे. या सर्वाना तात्काळ अटक करुन या प्रकरणाचे खरे सत्य जनतेसमोर गुहागर पोलिसांनी आणावे. जेणेकरुन तपासातील दिरंगाईतून उशीरा का होईना आमच्या नेत्यावर म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार श्री. भास्करराव जाधव यांचेवर झालेले आरोप खोटे व त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करणारे होते व आरोप करणाऱ्यांचा हेतु हा निवडणुकीतील आमच्या पक्षाच्या उमेदवाराचे नाव बदनाम करुन त्यांच्या होणाऱ्या मतदानावर कसा जाणीवपुर्वक परिणाम करता येईल असे कृत्य घडविले गेले आहे. त्यातील खोटारडेपणा हा जनतेसमोर जाहिरपणे उघड व्हावा, अशी विनंती गुहागर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनातून केली आहे. Statement to the police by Ubata Party
गुहागर पोलीस स्थानकात निवेदन देण्यासाठी तालुकाप्रमुख सचिन बाईत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, राज विखारे, सोहंम सातार्डेकर, राजाराम गुहागरकर, सतीश शेटे, सारिका कनगुटकर, संगीता वराडकर, आदेश मोरे आदी उपस्थित होते. Statement to the police by Ubata Party