बसव़ेश्वर महाराज; गुहागर तालुका वीरशैव लिंगायत गुरव संघटनेतर्फे
गुहागर, ता. 22 : महात्मा बसव़ेश्वर महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने गुहागर तालुका वीरशैव लिंगायत गुरव संघटना यांचे वतीने मा.तहसिलदार मॅडम यांना निवेदन देणेत आले. जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार हिंदू धर्माच्या देवता, धर्मगुरू, संत, राष्ट्रपुरुष तसेच सध्या महात्मा बसव़ेश्वर महाराज यांचे विटंबन केलेल्या वक्तव्याची चौकशी करून त्यांचेवर शासनाने गुन्हा दाखल करावा. असे निवेदनात म्हटले आहे. Statement to Tehsildar regarding Jitendra Aavhad
लिंगायत समाजाचे संस्थापक महात्मा बसव़ेश्वर महाराज यांचेबद्दल जितेंद्र आव्हाड याने चुकीचे विधान करून आठ कोटी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. व असंतोष निर्माण केला आहे. यांच्या निषेध नोंदविण्यासाठी गुरुवार दिनांक 19/10/2023 सकाळी 11 वा.गुहागर तहसील कार्यालय येथे गुहागर तालुक्यातील समाज बांधव उपस्थित राहून मा.तहसिलदार मॅडम यांना निवेदन देणेत आले. Statement to Tehsildar regarding Jitendra Aavhad