बौद्ध भिक्षुंना अपमानीत केल्याबद्दल बिहार पोलिसांचा आणि बिहार सरकारचा जाहिर निषेध
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 04 : बिहार येथील “बोधगया महाबोधी महाविहार ” मुक्तीसाठी बौद्ध भिक्षुंनी शांततामय मार्गाने चालू केलेल्या आंदोलनास बिहार पोलिसांनी अमानुषपणे ओढत नेऊन अपमानीत केले त्यास जबाबदार असणाऱ्या बिहार पोलिसांचा आणि बिहार सरकारचा बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने जाहिर निषेध करून “बोधगया महाबोधी महाविहार” ब्राम्हणी भिक्षुंच्या ताब्यातून बौद्ध भिक्षुंच्या बौद्ध जनतेच्या ताब्यात द्यावे, असे जाहिर निवेदन गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांना बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रति राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहार, पटनाचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, राज्यपाल महाराष्ट्र राज्य सी. पी. राधाकृष्णन यांना पाठविण्यात आल्या आहेत. Statement to Tehsildar on behalf of Dhamma Association
बोधगया, बिहार (भारत) येथील जगातील बौद्धांचे धार्मिक श्रद्धास्थान असलेले “बोधगया महाबोधी महाविहार हे जगातील प्रमुख अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ असून जगाच्या कानाकोपऱ्यातील बौद्ध धर्मिय लोक येथे श्रद्धेने नतमस्तक होण्यासाठी येत असतात तसेच इतर सांप्रदायी लोक, पर्यटकही येथे भेट देण्यासाठी येत असतात ” बोधगया महाबोधी महाविहार ” हे बौध्दांचा वारसा असलेले महाविहार आहे. त्याच्यावर ब्राम्हणांचा कब्जा आहे तेव्हा तात्कालिन बिहार सरकारने बोधगया मंदिर कायदा १९४९(BTMC ACT 1949) मध्ये तशी व्यवस्था करुन ठेवलेली आहे. “वारसा बौद्धांचा त्यावर सत्ता मात्र ब्राम्हणांची”, हिंदूची हा अजब न्याय बिहार सरकारने करुन ठेवले आहे. भारत हि बुद्ध भूमी आहे. अशी जागतिक स्तरावर भारताची विशेष ओळख आहे. परदेशी दौरा करताना भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राजकीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना परदेशी दौरे करणारे अभिमानाने सांगतात की, मी बुद्ध भूमीमधून आलो आहे. Statement to Tehsildar on behalf of Dhamma Association


हिंदूच्या ताब्यातून महाबोधी महा बुद्ध विहार पुर्णपणे मुक्त करुन त्याचा ताबा बौद्धांकडे द्यावा यासाठी यापूर्वी पू. अनागरिक धर्मपाल यांचेपासून आतापर्यंत बौद्ध धर्मगुरु भिक्षुं गण आणि बौद्ध जनता शांततेच्या मार्गाने प्रयत्न करीत आहेत तर काही भिक्षुं आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांचेवर हि वेळ बिहार सरकारने आणली आहे. याला जबाबदार पूर्ण पणे बिहार सरकार आहे. तारीख २८ चे पहाटेला मोठ्या संख्येने उपोषणाला बसलेल्या आमच्या बौद्ध धर्मगुरूंना पोलिसांनी अमानुषपणे ओढत नेऊन अपमानीत केले आहे त्यांना कोठे ठेवले आहे याची माहिती मिळत नाही. आमच्या धर्म गुरुंवर बिहारचे पोलिसांनी जो अमानुषपणे अत्याचार केला आहे. त्या बिहार पोलिसांचा आणि बिहार सरकारचा बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी, (महाराष्ट्र राज्य) या धम्म संघटनेच्या वतीने आंम्ही जाहिर निषेध करीत आहोत. Statement to Tehsildar on behalf of Dhamma Association
असे जाहीर निवेदन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी या धम्म संघटनेच्या वतीने धम्म संघटनेचे गुहागर तालुका अध्यक्ष सुरेश (दादा) सावंत, उपाध्यक्ष विद्याधर राजाराम कदम, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, उपकार्याध्यक्ष अनिल सुर्वे, सरचिटणीस सुनिल गमरे, कोषाध्यक्ष वसंत कदम, कार्यकारणी सदस्य संदिप कदम, विभाग अधिकारी गुहागरचे वैभव गमरे, पेवे नं. २ चे विभाग अधिकारी राकेश पवार, विभाग नं. ३ गिमवी चे विभाग अधिकारी मनोज गमरे, विभाग नं. ४ वेळंब चे विभाग अधिकारी सुरेश जाधव, विभाग नं. ५ पिंपरचे विभाग अधिकारी प्रभाकर मोहिते, विभाग नं. ६ शीर चे विभाग अधिकारी सचिन पवार, विभाग नं. ७ कुडली चे विभाग अधिकारी विनोद यादव, भीमसेन सावंत,शशिकांत जाधव, दशरथ पवार यांनी हे निवेदन गुहागर तहसीलदार श्री.परिक्षित पाटील यांना दिले. Statement to Tehsildar on behalf of Dhamma Association