गुहागर, ता. 20 : भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची ट्विटर पोस्टद्वारे मानहानी व बदनामी केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे निवेदन भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका महिला मोर्चा अध्यक्ष श्रद्धा घाडे व भाजपा महिला मोर्चा प्रदेश समन्वयक आरती तायडे यांनी गुहागर पोलीस निरीक्षक यांना दिले. Statement to police regarding defamation of Chitra Wagh

भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्राच्या वतीने जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होतो तिथे आवाज उठवून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात सक्षमपणे चालू आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्या विषयी मानहानी व बदनामीकारक असे ट्विट करून त्यांचे चारित्र्य हनन व बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. Statement to police regarding defamation of Chitra Wagh

राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाण्याचा प्रकार हे कदापी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सहन करणार नाही. म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चा प्रदेश समन्वयक आरती तायडे महिला मोर्चा अध्यक्षा श्रद्धा गाडी यांच्या वतीने गुहागर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक भाग्यलक्ष्मी कानडे स्नेहा बार टक्के ज्योती परतुरे वैशाली मावळणकर आदी उपस्थित होते. Statement to police regarding defamation of Chitra Wagh
