• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 March 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रस्त्यासाठी मोफत दिलेली जमीन परत घेऊ

by Mayuresh Patnakar
October 19, 2022
in Guhagar
26 0
0
Statement of villagers to construction department
51
SHARES
145
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वरचापाट ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुनावले

गुहागर, ता. 19 : वरचापाट येथील रस्त्यावरील खड्डे जर शासनाला बुजवता येत नसतील तर आम्हाला रस्त्यासाठी मोफत दिलेली जमीन परत घ्यावी लागेल, असा इशारा गुहागर वरचापाट मधील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. Statement of villagers to construction department

गुहागर वेलदूर या रस्त्यावर अद्वैत जोशी ते डॉ. आनंद खरे यांचे घरापर्यंत भरपूर खड्डे आहेत. त्याचप्रमाणे वरचापाट दत्त मंदिर ते नरनारायण मंदिर परिसरातही असेच खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळेअनेक दुचाकी स्वारांचा अपघात झाला आहे. सोमवारी 17 ऑक्टोबरला एक वृद्ध दांपत्य अद्वैत जोशी यांच्या घरासमोर दुचाकी वरून पडले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर वरचापाट मधील ग्रामस्थ संतप्त झाले. Statement of villagers to construction department

Statement of villagers to construction department

बुधवारी (दि. 19)  रोजी गुहागर वरचापाट मधील ग्रामस्थांनी गुहागर मधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयाला भेट दिली. उपविभागाच्या उप अभियंता निकम मॅडम यांच्याशी चर्चा केली. तसेच निवेदनही दिले. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, गुहागर शहराच्या विकासाला सहकार्य करण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला गुहागर वेलदूर रस्त्यावरील बांध आत घेण्याची विनंती केली होती. अधिकाऱ्यांच्या विनंतीचा मान राखून कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता सर्व ग्रामस्थांनी आपले बांध आत घेतले. त्यामुळे अनेकांचा घराचा उंबरठा हा रस्त्यालगत आला. तरी देखील वरचापाट ग्रामस्थांनी तक्रार केली नाही. भूसंपादनामध्ये घातलेल्या पैशांमधून बांधकाम विभागाने उत्कृष्ट रस्ता बनवणे व त्याची देखभल ठेवणे आम्हाला अपेक्षित होते. मात्र ही किमान अपेक्षा पूर्ण करु शकत नाही. Statement of villagers to construction department

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही दरवर्षी खड्डे कसे बुजवतो, त्या रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी डांबरीकरण कसे केले, याचे दाखले दिले. मात्र सद्यस्थितीत पडलेले खड्डे आपण का बुजवू शकलो नाही, याचे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नव्हते. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याची देखभाल व दुरुस्ती जमणार नसेल तर आम्ही मोफत दिलेली जमीन परत घेतो. असा इशारा अधिकाऱ्यांना दिला. Statement of villagers to construction department

Statement of villagers to construction department

यावेळी नगरसेवक समीर घाणेकर म्हणाले की, ग्रामस्थांची मागणी रास्त आहे. रस्ता रुंद झाल्यानंतर वाहनांचा वेगही वाढला आणि खड्ड्यांचे प्रमाणही वाढले. गुहागर वेलदूर रस्त्यावर किरकोळ अपघात सातत्याने होतात. रस्ते सुरक्षा आणि देखभाल दुरुस्ती शासनाला जमत नसेल तर नागरिकांच्या भूमिकेला नगरसेवक म्हणून माझे समर्थन असेल. Statement of villagers to construction department

यावेळी प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक समीर घाणेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, शहराध्यक्ष संगम मोरे, दुर्गादेवी देवस्थानचे ट्रस्टी अतुल फडके, कोपरी नारायण देवस्थानचे ट्रस्टी अनिल वैद्य, अद्वैत गोखले, अद्वैत जोशी, अमित जोशी,  ज्येष्ठ कार्यकर्ते उदय आठवले, सदानंद दीक्षित, सोहम वैद्य, रोहित मावळणकर आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. Statement of villagers to construction department

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarStatement of villagers to construction departmentUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet13
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.