• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वरवेली ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

by Ganesh Dhanawade
February 8, 2024
in Guhagar
122 1
1
Statement of Varveli Villagers to Group Development Officers

गुहागर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेले ग्रामस्थ

240
SHARES
686
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नळपाणी योजनेत जैन इरिगेशन कंपनीचे पाईप टाकण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम

गुहागर, ता. 08 : जलजीवन मिशन अंतर्गत गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रां.प. कार्यक्षेत्रात चालू असलेल्या नळपाणी योजनेतील समस्यांबद्दल वरवेली ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. Statement of Varveli Villagers to Group Development Officers

या निवेदनात म्हटले आहे की, वरवेली ग्रा.प. कार्यक्षेत्रात सध्या जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. यापुर्वी ग्रामस्थांनी तत्कालीन गटविकास अधिकारी प्रशांत राऊत व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांची भेट घेवून वरील योजनेतर्गत जैन इरिगेशन कंपनीचे पाईप वापरण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या समक्ष भेटीमध्ये जैन इरिगेशन पाईप लाईन टाकण्याचे मान्य केलेले असून संबधित ठेकेदार यांना आणलेल्या शक्ती पॉलीमर कंपनी ऐवजी जैन ईरिगेशन कंपनीचे पाइप वापरण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार ठेकेदार याने जॅकवेलपासून साठवणूक टाकी पर्यंत जैन इरिगेशन कंपनीचे चार इंच साइजचे पाईप टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. Statement of Varveli Villagers to Group Development Officers

तथापि आता नळ धारकांना पाणी पुरवठयाबाबत उपयोगात आणावयाचे पाईप लाईन शक्ती पॉलीमर या कंपनीची वापरावी लागेल असे सरपंच, ग्रा.पं. वरवेली यांनी सांगितले आहे. गावातील काही लाभधारकांनी पाणी टंचाई होऊ नये म्हणून नाइलाजास्तव शक्ती पॉलीमर कंपनीचे पाईप टाकण्यास संमत्ती दिलेली आहे. परंतु बहुतांश ग्रामस्थ या विरोधात असून आम्हाला जैन इरिगेएशन कंपनीचे पाईप याकामी हवे आहे. तशी आमची मागणी आहे. आपण संबधित ठेकेदार यांना सुचना देवुनही त्या आपल्या आदेशाचे भंग करुन शक्ती पॉलीमर या कंपनीचे पाईप वापरण्यात येत आहे. वरवेली ग्रा.पं. कडे वेळोवेळी याबाबतची मागणी करुनही ग्रा.पं. व ठेकेदार यांच्याकडून जैन इरिगेशन कंपनीचे पाईप टाकण्या संदर्भात सहकार्य मिळत नाही. Statement of Varveli Villagers to Group Development Officers

संबंधित ठेकेदारकडुन पाईप लाइन टाकण्याच्या वेळी नियमाप्रमाणे तीन फुट खोल पाईप टाकण्याच्या सुचना असूनही अनेक ठिकाणी पाईप कमी खोदाई करुन टाकण्यात आलेले आहे. तसेच मराठवाडी भागात रस्त्याशेजारी गटारातुन पाइपलाईन टाकण्यात आलेली आहे. तसेच शासनाच्या निधीतुन बांधण्यात आलेले गटारातील मधील भाग फोडून पाईपलाइन वरचेवर टाकण्यात आली आहे. त्यावर माती टाकून पाईपलाईन बुजविण्यात आलेली आहे. Statement of Varveli Villagers to Group Development Officers

संबंधित ठेकेदार यांना वारंवार सुचना देवुनही त्यांनी कधीही कामाच्या ठिकाणी व ग्रामसभेच्या ठिकाणी उपस्थित राहून नळपाणी धारकांच्या अडचणी व समस्या कधीही जाणून घेतलेल्या नाहीत. तरी वरील शासन योजनेची गावामध्ये चांगल्या प्रकारे कार्यवाही व्हावी व ग्रामस्थांच्या अडीअडचणी दूर करून अंतर्गत लाईन करता जैन इरीगेशन कंपनीचे पाईप वापरण्याबाबत ठेकेदार यांना सक्त सुचना दयाव्यात, अशी मागणी केली आहे. Statement of Varveli Villagers to Group Development Officers

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarStatement of Varveli Villagers to Group Development OfficersUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.