भाजपा महिला मोर्चाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी
गुहागर, ता. 14 : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची मानहानी व बदनामी केल्याबाबत भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी यांच्यावतीने कठोर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. Statement of BJP Mahila Morcha to District Police
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही भाजप महिला मोर्चाच्या प्रतिनिधी समाजात महिला सबलीकरण करण्याचे तसेच सामाजिक, आर्थिक स्तरावर महिलांना सक्षम करण्याचे काम करतोय. जिथे जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे आम्ही आवाज उठवितो. पण सध्या भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. हे पाहता एक महिला म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही. आव्हाड यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी. Statement of BJP Mahila Morcha to District Police
जितेंद्र आव्हाड यांनी ९ जून रोजी रात्री चित्रा वाघ यांच्यासंदर्भात बदनामीकारक मजकूर ट्विटरवर अपलोड केला. चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामजिक जीवनातून उठविण्याचा प्रकार केला आहे. जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जात आहेत, हे सहन केले जाणार नाही. म्हणून महिला नेत्या चित्रा वाघ यांची ट्विटवरुन बदनामी, मानहानी केल्याप्रकरणी आणि बदनामकारक मजकूर ट्विटवर टाकल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आली. Statement of BJP Mahila Morcha to District Police
भाजप महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ. शिल्पा मराठे, महिला मोर्चा पदाधिकारी कार्यकर्त्या सौ. अंजली साळवी, सौ. वर्षा ढेकणे, सौ. रेशम तोडणकर, सौ. प्रणाली रायकर, सौ. उषा राजपूत, सौ. अपर्णा खरे यांनी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदन दिले. Statement of BJP Mahila Morcha to District Police